बाजारात जर आपण तांदूळ पाहायला गेलो तर आपल्याला अनेक प्रकारच्या व्हरायटी चे तांदूळ पाहायला भेटतात जे की काही तांदूळ महाग असतात तर काही स्वस्थ असतात.आपल्याला जो तांदूळ चांगला वाटतो तोच तांदूळ आपण खरेदी करतो. असाच एक तांदूळ जो ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे जे की या तांदळाला देशात तर मोठ्या प्रमाणात मागणी आहेच पण या व्यतिरिक्त परदेशातून सुद्धा या तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ब्रम्हपुरी तालुका हा तांदळाचे मुख्य द्वार म्हणून ओळखला जातो जे की ब्रम्हपुरी च्या तांदळाला परदेशातून मागणी आलेली आहे. रोज कमीत कमी ५०० टन तांदूळ परदेशात जात असल्याचे चित्र आपल्या समोर येत आहे जे की या तांदळाची ओळख सात समुद्र पार झालेली आपल्याला दिसून येत आहे.ब्रम्हपुरी च्या या तांदळाचे तसेच ज्याला सातासमुद्रा पार देशातून मागणी येत आहे असे तांदळाचे नाव "उकडा" तांदूळ. उकडा तांदूळ हा ११० जातीच्या धानापासून तयार केला जातो यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्याची चांगलीच ओळख निर्माण झालेली आहे.
हेही वाचा:किसान क्रेडिट कार्ड,एसबीआयकडे शेतकऱ्यांसाठी आहे ही ऑफर
ब्रम्हपुरी तालुका मध्ये पाहायला गेले तर जवळपास १५ राईस चे मिल आहे जे की सध्या तिथे तांदळापासून उकडा तांदूळ या तांदळाचे उत्पादन घेतले जात आहे.रोज उकडा तांदूळ जवळपास ५०० टन परदेशात पाठवला जात आहे जे की त्यामध्ये साऊथ आफ्रिका, दुबई, सिंगापूर, केनिया असे देश सामील आहेत. ब्रम्हपुरी मधील राईस मिल येथे या तांदळाची चांगल्या प्रमाणे निर्मिती केली जाते.आणि नंतर हा तांदूळ चांगल्या प्रकारच्या वजनानुसार त्या त्या पिशवीमध्ये पॅक करतात. उकडा तांदळाच्या पिशव्या तेथून ट्रक द्वारे नागपूर ला जातात, नागपूर हुन रेल्वे द्वारे मुंबई ला जातात आणि तिथून जहाज मध्ये सर्व माल टाकून समुद्रावाटे परदेशात उकडा तांदूळ दाखल होतो.
ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये पाहायला गेले तर जवळपास २९ हजार हेक्टरवर धान्याची लागवड केली जाते त्यामध्ये शेतकरी काही धान आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी बाजूला काढून ठेवतो तर जे राहिलेलं धान आहे त्याची तो विक्री करतो. हा धान विकण्याच्या हंगाम नोव्हेंबर महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत चालतो त्यामध्ये जो उच्च प्रतीच्या तांदूळ म्हणजेच चांगल्या प्रकारचा क्वालिटी चा जो तांदूळ असेल त्या तांदळाला दोन हजार सहाशे रुपये पर्यंत भाव मिळतो.
देशात सुद्धा या तांदळाची मागणी आहेच पण त्याच बरोबर पाहायला गेले तर साऊथ आ फ्रिका, दुबई, सिंगापूर व केनिया या परदेशातून सुद्धा उकडा तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे जे की रोज ५०० टन तांदूळ बाहेर जात आहे.
Published on: 05 August 2021, 02:48 IST