देशातील पंजाब, हरियाणा या राज्यातील बासमती उत्पादकांसाठी एक चांगली बातमी हाती आली आहे. पंजाब, हरियाणा या राज्यात उत्पादित होणारा बासमती तांदळाला दक्षिण आशियातील नेदरलँड, बेल्जिम या देशात मागणी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
भारतातून बेल्जियममध्ये केल्या जाणाऱ्या निर्यातीत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यातील आहे. तर नेदरलँडने आपली आयातही वाढवली आहे. युरोपियन देशात होणाऱ्या मोठ्या मागणीमुळे भारतातील बासमती उत्पादक राज्य पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.
बासमती तांदळाची प्रतवारी ११२१ पुसा या वाणाचे इतर देशात मोठी निर्यात होत असून नोव्हेंबरमहिन्यापासून या प्रतवारीला चांगाला दर मिळत आहे. दरम्यान, युरोपातील ग्राहक हे सुगंधित बासमती तांदुळ म्हणजेच सुशी, रिझोटो या वाणाकडे अधिक आकर्षित होत असतो. कोहिनूर फुड्सचे सहव्यवस्थापक गुरनाम अरोरा म्हणाले की, युरोप हे मोठे बाजारपेठ आहे. दरम्यान या वर्षी या साथीच्या काळातही युरोपातील ग्राहकांनी आपल्या घरगुती वापरासाठी बासमती तांदळाची मोठी खरेदी केल्याचेही त्यांनी सांगितले.
या देशांमधील दक्षिण- पुर्व अशियन लोकांनी मोठ्या प्रमाणात बासमतीची खरेदी केली आहे. दरम्यान कोविड-१९ च्या नवीन स्ट्रेनची भीती युरोपयीन लोकांच्या मनात असल्याने या स्ट्रेनमुळे परत लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे लोक परत बासमतीची खरेदी मोठ्या प्रमाणात करतील अशी अपेक्षा अरोरा यांनी व्यक्ती केली.
Published on: 07 January 2021, 04:56 IST