1. बातम्या

केळी निर्यातीसाठी अपेडा बनानानेटसाठी मागणी , केळी उत्पादकांना होणार फायदा

Banana Crop

Banana Crop

नागपूर - राज्यातून केळीची निर्यात वाढली आहे. यामुळे उत्पादकांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन प्लॅटफार्म असावा, अशी मागणी केली जात आहे. त्याकरीता शासनस्तरावूरन अपेडा कडे बनानानेट साठी पाठपुराव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशात केळी लागवडीखालील सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी ८० हजार हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा, त्यासोबतच जळगाव, आणि नव्याने सोलापूर, जिल्ह्यातील कंदर या भागात केळी लागवड क्षेत्र वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अपेडा ने केळी लागवड क्षेत्र वाढत असल्यामुळेच सोलापूर जिल्ह्याचा आपल्या क्लस्टर मध्ये समावेश केला आहे. या जिल्ह्यातील कंदर हे गाव केळी गाव म्हणून नावारुपास आले आहे.

दरम्यान राज्यातून चार वर्षाआधी केळीची निर्यात फक्त २० ते २५ हजार टन होती. त्यात वाढ झाली असून ही निर्यात १ लाख ९५ हजार टनावर पोहोचली आहे. गेल्यावर्षी कंदर गावातून सर्वाधिक ६० हजार टन केळीची निर्यात झाली. २०१८ या वर्षीच्या हंगामात विदर्भातील अकोला जिल्ह्यातून केळीचे ३३ कंटेनर आखाती देशात पाठविण्यात आले. नरनाळा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ही निर्यात करण्यात आली. दुबई, इराक- इराण याच देशांमध्ये सध्या केळीची निर्यात होते. उर्वरित देशांपर्यंत देखील भारतीय निर्यातक्षन केळीचा प्रसार व्हावा याकरिता बनानानेट सारखा ऑनलाईन फ्लॅटफार्म उपलब्ध करुन देण्याची मागणी पुढे येत आहे. त्याकरिता अपेडाच्या स्तरावर पाठपुरावा शासनाकडून केला जात असला तरी त्याला मर्यादा असल्याने शेतकऱ्यांनी देखील यासंदर्भात दबावगट निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठिबक, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सहा- सात घड ठेऊन कट करणे, कर्टींग बॅगचा वापर, क्लिनिंग, वॉशिग, पॅकिग असे टप्पे निर्यातीत राहतात. नंतर कच्ची केळी निर्यात केली जाते. १३ ते १४ डिग्री तापमानात केळी निर्यात होते. आखाती देशात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी रॅपनींग चेंबरमध्ये केली पिकवून मार्केटमध्ये पाठवली जाते. दरम्यान अपेडाकडू हा हा पिकांसाठी
प्लॅटफार्म वापरला जातो. ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, बिटलनेट, बासमती राइसनेट, मीट नेट, ट्रेस नेट, पिनटनेट

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters