सध्याच्या काळात जे वातावरण झाले आहे याचा सर्वात जास्त फटका फळबागांना बसलेला आहे. शेतकरी वर्ग जरी फळबागांचे नुकसान झाले तर फवारणी करून ते नुकसान भरून काढत होता मात्र या वाढत्या थंडीमुळे केळीच्या मागणीत पूर्णपणे घट झाली आहे. बारमाही चालणारी केळी थंडीत मंदावली आहे. केळी ची फळधारणा सुरू होण्यापूर्वी च नैसर्गिक संकटे चालू झाली आहेत. मागील दिवसात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे केळीवर करपा रोग पडला त्यामधून कसे तरी शेतकऱ्यांनी सावरले तो पर्यंत कडाक्याची थंडी पडली जी पिकासाठी हानिकारक ठरली. वाढत्या थंडीमुळे नागरिक केळीकडे पाठ फिरवत आहेत.
केळी बागाची अशी घ्यावी काळजी :-
सध्या लागवड झालेल्या केळीवर वातावरणाचा परिणाम होत आहेत. थंडीच्या दिवसात फुल लागवड केलीच नाही पाहिजे कारण थंडीत काहीवेळा अशी परिस्थिती येते की गुच्छ खोडातून योग्य प्रकारे बाहेर येत नाही त्यामुळे गुच्छाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत नाही. तुम्ही जर टिशू कल्चर पद्धतीने तयार केलेली केळी असेल तर त्याचे फुल ९ महिन्यात लागते तर साकरने लावलेल्या केळीचा घड १० - ११ महिन्यात येतो.
नांदेडचा पारा 10 अंशावर :-
आतापर्यंत कधीच नाही मात्र यंदा थंडीने मराठवाडा सुद्धा गारठवला आहे आणि याचाच परिणाम रब्बी पिकांवर झालेला आहे. रब्बी पिकांना थंडी पोषक असते मात्र यावेळी थंडीचा अतिरेक झाल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. दिवसेंदिवस वाढतच असणाऱ्या थंडीमुळे केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. थंडीमुळे बाजारात केळीकडे नागरिकांनी पाठ फिरवली त्यामुळे दर घटतच गेले आहेत तर दुसऱ्या बाजूस शेतकऱ्यांना केळी ची बाग जोपासावी लागत आहे.
अशी आहे दराची अवस्था :-
मागील पंधरा दिवसापासून थंडीत कडाक्याची वाढ झाली असल्यामुळे बाजारात सुद्धा नागरिक केळी कडे पाठ फिरवत आहेत त्यामुळे केळी चे दर घसरले आणि याच चांगलाच फटका शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना बसलेला आहे. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रति क्विंटल हजार रुपये ने केळी उचलत आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांचे हाल तर दुसऱ्या बाजूला बाजारात कोण विचारत नसल्याने व्यापारी वर्गाचे हाल चालू आहेत.
Published on: 28 January 2022, 01:13 IST