News

सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या पार्श्वभूमीवर देशातील व्यावसायिक सिलिंडरच्या किमती मध्ये कपात करण्यात आलेली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड नुसार आजपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 25.5 रुपये तसेच मुंबईमध्ये 32.5, चेन्नईमध्ये 32.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

Updated on 01 October, 2022 3:51 PM IST

सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या पार्श्वभूमीवर देशातील व्यावसायिक सिलिंडरच्या किमती मध्ये कपात करण्यात आलेली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड नुसार आजपासून दिल्‍लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 25.5 रुपये तसेच मुंबईमध्ये 32.5, चेन्नईमध्ये 32.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

नक्की वाचा:5G नेटवर्कचा शेतीला होणार मोठा फायदा! शेतकऱ्यांना मिळणार हवामानाची अचूक माहिती

आता नवीन किमती कशा असतील?

 इंडेनचा 19 किलोचा सिलेंडर दिल्लीत अगोदर 1885 रुपयांना मिळत होता तो आता 1859.5 रुपयांना मिळेल. कोलकत्ता मध्ये 19 किलोचा सिलेंडर 1995.50 रुपयांना मिळत होता तर तो आता 1959 रुपयांना मिळणार आहे. याबाबतीत आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडर 1844 रुपयांना मिळत होता तर तो आता 1811.5 रुपयांना मिळेल.

नक्की वाचा:ड्रोनच्या सहाय्याने तरुणांना कृषी प्रशिक्षण,DGCA कडून गरुड एरोस्पेसला मान्यता

नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये झाली वाढ

 शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत 40 टक्क्यांची वाढ झाली असून येणाऱ्या काळात खत निर्मिती तसेच वाहन चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस देशात महागण्याची शक्यता आहे.

तसेच शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत देखील वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती 27 रुपयांनी वाढून सहा हजार 727 रुपये प्रति बॅरल अशा पोहोचल्या.

नक्की वाचा:नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केळीच्या दरात वाढ, मात्र केळीच्या तुटवड्याने व्यापारी वर्ग चिंतेत

English Summary: decrease price of comercial gas cylinder from today in india
Published on: 01 October 2022, 03:51 IST