महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन परतीच्या पावसाने थैमान घातले. त्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. संभाजीराजे यांनी पत्रात लिहिली आहे की, शिवरायांच्या ‘’कष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा ज्यांना बैलजोडी आणि जोत हवा असेल त्यांना ते द्या, पैसे द्या, खंडी दोन खंडी धान्य द्या. मदतीचा वसू वाडी दिडीने करू नका मुद्दल असेल ती हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल अशा प्रकारचा संदर्भ संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. पुढे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, मी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन दोन-तीन किलोमीटर पायी चालत जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. त्यामुळे जे रस्त्यावरून दिसत आहे त्यापेक्षा परिस्थिती अधिक भयानक असल्याची बाबही संभाजीराजे यांनी सांगितली.
संभाजी राजांनी पत्रात केलेल्या प्रमुख मागण्या
- 2005 चा राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत ठराव घेऊन ओला दुष्काळ आणि गंभीर पूरस्थिती जाहीर करणे. तसेच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत मागण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ तयार करून तो केंद्राकडे पाठवणे. त्या कायद्यानुसार, एका आठवड्यात निरीक्षण पथक राज्यात येईल आणि राज्याला निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करता येईल.
- तसेच शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी सरसकट मदत द्यावी. ही जवळपास सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.
- पीक विमा कंपन्यांना ताकीद देऊन त्यांना शेतकरी हितासाठी काम करण्यास भाग पाडणे. कारण बराच विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.
- ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, शेतकऱ्यांच्या जमिनीतले माती वाहून गेली शेतात नुसते खडक साचून पडलेत त्यांच्या नुकसान भरपाईसाठी विशेष तरतूद करून विशेष त्याची घोषणा करणे.
- ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पावसामुळे आडवा पडला आहे, त्यांच्या ऊसाची तोड किंवा उठाव प्राथमिक की त्यांनी सर्वात आधी करण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश देणे.
- बऱ्याच शेतकऱ्यांची या पुरामध्ये गुरे ढोरे वाहून गेले आहेत. त्यांच्यासाठी नुकसान भरपाईची तरतूद केली पाहिजे.
- घरांची पडझड झाली, बरीच घरे पावसामुळे वाहून गेली अशा सगळ्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करणे.
- पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून घेणे.
- अतिरिक्त पावसाने शिवारामध्ये चवाळं लागली आहेत, तिथे उभ्या पिकांचे नुकसान झाले त्याबरोबर त्या शेतकऱ्यांना रब्बीचा हंगामाला सुद्धा मुकावे लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय घ्यायची आवश्यकता आहे.
Published on: 23 October 2020, 06:06 IST