News

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 2020 21 या वर्षीच्या हंगामात शासकीय केंद्रांवर तुर खरेदी साठी महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांसाठी प्रति हेक्‍टरी उत्पादकता जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जालना जिल्ह्यासाठी सर्वाधिक 20 क्विंटल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्वात कमी म्हणजे चार क्‍विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.

Updated on 25 January, 2021 11:00 AM IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 2020 21 या वर्षीच्या हंगामात शासकीय केंद्रांवर तुर खरेदी साठी महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांसाठी प्रति हेक्‍टरी उत्पादकता जाहीर करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यासाठी सर्वाधिक 20 क्विंटल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्वात कमी म्हणजे चार क्‍विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.2020 21 यावर्षीच्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख 89 हजार पन्नास टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा:तूर डाळ खाणं होईल महाग; भाजीपाला अन् डाळींचे दर शंभरी पार

त्यासाठी नाफेड तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महा एफ पी  सी शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या खरेदी केंद्रावर 28 डिसेंबर पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली असून या केंद्रांवर गर्दी व्यवस्थित व सुरळीतपणे होण्यासाठी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादक त्यानुसार प्रती  शेतकरी तूर खरेदी करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश

सहकार,  पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अव्वल सचिव सुनंदा घड्याळे यांनी राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक,,  महा एफ पी सी चे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.

English Summary: Declare productivity per hectare for pigeon peas purchase
Published on: 25 January 2021, 11:00 IST