News

मुंबई: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

Updated on 30 November, 2022 10:08 AM IST

मुंबई: राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. बळीराजाला खूश कसे करायचे याचे हिताचे निर्णय घेतले जात आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून, एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही साखर कारखानदारांमधील हवेतील अंतराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.

जग पुन्हा एकदा घाबरले! चीन मध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक

कापणी व वाहतुकीचे निकष ठरवताना पुढील हंगामापासून वजनकाट्यासाठी डिजिटल वजन काटे सुरू करावेत, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी त्यांनी ऊस वाहतूकदारांच्या समस्यांबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविण्याचे निर्देश दिले.

CNG कार चालवत आहात तर ही बातमी एकदा वाचाच; होईल मोठा फायदा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी सर्व कृषी फीडर सौरऊर्जेवर चालत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी 2000 मेगावॅटचा वीजप्रकल्प करण्यात येत असून त्यासाठी सरकारी जमीनही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट; अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी

English Summary: Decision to give lump sum FRP to sugarcane farmers in the state
Published on: 30 November 2022, 10:08 IST