राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीमध्ये बसून लवकरात लवकरात मार्ग काढला जाईल असे आश्वासन मंत्रालयात जमलेल्या शेतकऱ्यांना दिले होते. मंत्रालयातील खुल्या प्राणांगत बैठक आयोजित करून ते त्यामध्ये सांगत होते, यावेळी तिथे उपस्थित पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे, लोकप्रतिनिधी व राज्यातील बैलगाडी चे मालक होते.
बैलगाडी शर्यत पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न:-
बैलांच्या शर्यतीसाठी त्याचे शरीर, आरोग्य आणि सराव महत्वाचा आहे. त्यासाठी सराव करण्यासाठी मार्ग तयार करण्यात येण्याचे प्रयत्न सुरू आहेत, राज्यामध्ये बैलगाडा शर्यत सुरू राहावी म्हणून पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे तसेच विधानसभा सदस्य सुद्धा यासाठी सकारात्मक आहेत. मंत्रालयाच्या प्रांनागणात पहिल्यांदा च ही बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी घेतल्यामुळे जयंत पाटील यांनी कौतुक केले.बैलगाडा शर्यत ही राज्याला एक लाभलेली परंपरा आहे आणि ती परंपरा तसेच शेतकऱ्यांचा छंद आपणाला जपायचा आहे. बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी आपल्या गायी बैलाचे चांगल्या प्रकारे संगोपन करतात.
बैलगाडी ची शर्यत लावण्याच्या आधी महिनाभर बैलांचा सराव करण्यासाठी मार्ग काढण्यात येणार आहेत असे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:जम्मू-काश्मीरमध्ये बनतील 100 दुग्ध गाव, होईल दूध उत्पादनात आत्मनिर्भर
बैलगाडा शर्यतीबद्दल महिनाभरात निर्णय:-
कायद्याच्या चौकटीत राहून संविधान व घटनेचा आधार घेऊन बैलगाडीच्या शर्यतीसाठी मार्ग काढण्यात येईल जो येईल त्या महिन्यात निर्णय घेण्यास प्रयत्न करण्यात येईल. जर कोणती गरज भासली तर त्यासाठी नवीन कायदा सुद्धा करण्याचा विचार केला जाईल असे सुनील केदार यांनी सांगितले आहे. राज्यात खिलार जातीच्या बैलाचे संगोपन होण्यासाठी उपक्रम राबिवला जाईल जे की ही जात फक्त शर्यतीसाठी नाही तर दूध उत्पादन साठी सुद्धा महत्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपन होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ सल्लागारांचीही मदत घेतली जाईल असे सुनील केदार यांनी सांगितले.
हे सरकार शेतकऱ्यांचे आहे तसेच बैलगाडा मालक व विविध संघटना शर्यत हा शेतकरी व बैलगाडा मालक यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगितले.
Published on: 25 August 2021, 09:19 IST