सध्याच्या परिस्थितीत हवामान बदलामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.कारणयेणारा पाऊस किंवा वादळ म्हणजेच कुठलीही नैसर्गिक परिस्थिती केव्हा येणार याचा अंदाज बांधता न आल्याने बरेच शेतकरी हवामान अंदाजा बद्दल गाफील राहतात अचानक आलेल्या संकटामुळे शेत पिके उध्वस्त होतात.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासून मागणी होती की हवामानाचा अचूक अंदाज बांधता यावा अशी यंत्रणाबसवण्यात यावी. जेणेकरून अचानक येणाऱ्या नैसर्गिक संकटं पासून होणारे नुकसान टाळता येईल असा त्यामागचा उद्देश आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वातावरण बदलाची अचूक माहिती मिळावी,वारंवार नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळता यावे यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारच्या कृषी आणि विज्ञान मंत्रालयाने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सी बँड डॉप्लर रडार बसण्यास परवानगी दिली होती. त्या दृष्टिकोनातून आता औरंगाबाद जिल्ह्यात हे रडार कोणत्या ठिकाणी बसवायचे जेणेकरून हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणे शक्य होईल,या संदर्भातील माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार कडून राज्य शासनामार्फत औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला खुलदाबाद किंवा म्हैसमाळ यापैकी एका ठिकाणी चाळीस चौरस मीटर जागा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्र औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज घेणे सोपे जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सी बँड डॉपलर रडारचा शेतकऱ्यांना असा होईल फायदा
- हे रडार कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना हवामान बदलास संदर्भातील माहिती अचूक मिळणार आहे.
- मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतीची फार मोठे नुकसान होते.केंद्र आणि राज्य सरकारकडून दहा वर्षात किमान दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुदानावरखर्च केले आहेत.या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील बँड डॉपलर रडार फायदेशीर ठरणार आहे.
- या रडारच्या कार्यक्षेत्रात 300 ते 400 किमी चा भूभाग किंवा परीघयेणार असल्याने यासाठी 15 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.(source-tv9marathi)
Published on: 06 February 2022, 01:27 IST