सध्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनाने एक मास्टर प्लॅन बनवला असून आता या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी होणार आहे. माहितीनुसार, 31 मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. यासंदर्भात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेद्वारे राज्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र, असे असले तरी या योजनेअंतर्गत अजूनही बहुतांशी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना रखडलेलीच होती. याची अंमलबजावणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने योग्य नियोजन आखले असल्याचे सहकार मंत्री यांनी सांगितलं. माहितीनुसार, या योजनेअंतर्गत जवळपास 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिली होती.
आता या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. या 54 हजार शेतकऱ्यांची जवळपास 200 कोटींची कर्जमाफी होणार आहे. यासंदर्भात विधान परिषद मध्ये बोलतांना बाळासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेच्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा 31 मार्च अखेरपर्यंत कमी केला जाईल असे सांगितले. ठाकरे सरकार सत्तेत येताच 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती.
येवेळी याचा राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे प्रोत्साहनपर रक्कम आणि उर्वरीत 54 हजार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी रखडली होती. आता या मार्च महिन्यातच ही कर्जमाफी निकाली काढली जाणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
यासाठी भाजपने ही मागणी लावून धरली होती. याकरिता बॅंकांनी 35 लाख थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सरकारला दिली होती. त्यानुसार हा कर्जमाफी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय घेतले जात आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत अनेक घोषणा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
साखर कारखाने शेतकऱ्यांचे मित्र का शत्रू? साखर उद्योगावर सगळ्या प्रश्नासाठी चर्चा सत्राचे आयोजन..
मोदींनी पाठवलेले किसान निधीचे पैसे परत करा, अपात्र असल्यास येईल अंगलट, 'अशी' आहे प्रक्रिया..
Published on: 22 March 2022, 05:52 IST