महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता, या अनुषंगाने ठाकरे सरकारने अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील केली. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेद्वारे राज्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र, असे असले तरी या योजनेअंतर्गत अजूनही बहुतांशी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना रखडलेलीच होती.
यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये या उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनाने एक मास्टर प्लॅन बनवला असून आता या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 31 मार्च अखेरपर्यंत उर्वरित सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. यासंदर्भात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिली होती त्यासंदर्भात प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने वारंवार महा विकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. मात्र आता रखडलेल्या शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार असल्याचे सूत्राद्वारे स्पष्ट झाले आहे.
याची अंमलबजावणी करण्यासाठी महा विकास आघाडी सरकारने योग्य नियोजन आखले असल्याचे सहकार मंत्री यांनी सांगितलं. हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत जवळपास 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिली होती आता या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याचे बघायला मिळत आहे.
या 54 हजार शेतकऱ्यांची जवळपास 200 कोटींची कर्जमाफी होणार आहे. यासंदर्भात विधान परिषद मध्ये बोलतांना बाळासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेच्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा 31 मार्च अखेरपर्यंत कमी केला जाईल असे सांगितले.
मित्रांनो ठाकरे सरकार सत्तेत आले आणि दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी महा विकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना ही योजना कार्यान्वित करून त्या वेळी जवळपास 31 लाख 76 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.
या शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानं शासनावर 20 हजार 250 कोटीचा अतिरिक्त बोजा आला. एकंदरीत शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला होता आणि अशातच कोरोना आल्याने शासनाची परिस्थिती बिकट बनली होती. त्यामुळे या योजनेअंतर्गत सुमारे 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली होती.
यामुळे विपक्ष वारंवार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र देखील दागत होते. परंतु आता महाविकास आघाडी सरकार उर्वरित शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ही कर्जमाफी या महिन्याच्या अखेरपर्यंत निकाली काढली जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
संबंधित बातम्या:-
चेरी टोमॅटोची लागवड करा आणि मिळवा दर्जेदार उत्पादन; वाचा याविषयी
कापसाला मिळाला 11 हजार 854 रुपये प्रति क्विंटल दर, पण; याचा फायदा फक्त व्यापाऱ्यालाचं
Published on: 22 March 2022, 04:19 IST