News

शासकीय रुग्णालयातील सावळा गोंधळ दिवसेंदिवस समोर येत आहे. यामुळे शासकीय रुग्णालयावराचा भरोसा दिवसेंदिवस नागरिकांकडून कमी होत आहे. त्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात अशी दुर्घटना घडली आहे.

Updated on 04 October, 2023 6:00 PM IST

Solapur News : नांदेड, छत्रपती संभाजीनगरनगर पाठोपाठ आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात एका चिमुकल्याचा मृ्त्यू झाला आहे. सोलापूरमधील भूमपरांडामध्ये ऑक्सिजनअभावी अवघ्या १४ महिन्यांच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण उपस्थित होऊ लागले आहे.

शासकीय रुग्णालयातील सावळा गोंधळ दिवसेंदिवस समोर येत आहे. यामुळे शासकीय रुग्णालयावराचा भरोसा दिवसेंदिवस नागरिकांकडून कमी होत आहे. त्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात अशी दुर्घटना घडली आहे. भूमच्या शासकीय रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने आणि ऑक्सिजन लावला नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालायत मृत्यूचं तांडव झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील १२ रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. यामुळे सरकारी यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. नांदेडमध्ये दोन दिवसात तब्बल ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्येही एका बाळाचा मृ्त्यू
नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीदरम्यान बाळ हातातून निसटून बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. मात्र डिलिव्हरी करताना विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं जात होतं. या प्रशिक्षणादरम्यान बाळ हातातून निसटून खाली पडून मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या वडिलांनी केला आहे.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. त्यापाठोपाठ नाशिक येथे आणि सोलापूर जिल्ह्यात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

English Summary: Death spree continues in the state Death of a toddler in the health minister's constituency
Published on: 04 October 2023, 06:00 IST