मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet expansion) दुसरी तारीख ठरल्याने नाराज आमदारांसाठी गुडन्यूज आहे.
नाराज आमदारांसाठी गुडन्यूज
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. शिंदे फडणवीस (Shinde fadanvis Government) सरकार स्थापन होऊन ४० दिवस उलटल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आता येत्या १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
हे ही वाचा: पुणे लोकसभा मतदार संघात फडणवीसांसाठी चाचपनी, केंद्रात दिली मोठी जबाबदारी
दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करुन नाराजी दूर करण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. अशातच १५ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे, ते शब्द पाळतील असं बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा: खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार कर्जावर विशेष सूट; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो आता शेतातील तणाचे टेन्शन मिटले, करा फक्त हे काम
Published on: 18 August 2022, 12:30 IST