1. बातम्या

दहावी आणि बारावी परीक्षाची तारीख निश्चित; २३ एप्रिलला पहिला पेपर

राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानुसार, यंदा बारावीची परीक्षा 23 एप्रिल पासून दहावीची परीक्षा 29 एप्रिल पासून सुरु होणार आहे.

KJ Maharashtra

 कोरोना संकटामुळे गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे एकंदरीत शिक्षण पद्धतीवर फार मोठा परिणाम झाला. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान दहावी आणि बारावी परीक्षा बाबतची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीचे परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू होईल तर 29 मे रोजी बारावी चा शेवटचा पेपर असेल.

तसेच दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावी परीक्षेचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

English Summary: Date of 10th and 12th exams fixed, first paper on 23rd April Published on: 22 January 2021, 04:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters