शेतकरी जरी आपल्या शेतात पिके घेत असतील तर त्यांना हवामान कसे आहे हे सांगण्याचे काम हवामान विभाग सांगत असते जे की त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. मागील वर्षांपासून हवामान विभाग अगदी अचूकपणे हवामानाचा अंदाज लावत आहे. परंतु यावर्षी खरीप हंगामात वाढणारी पिके जसे की सोयाबीन, उडीद व मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात तयारी तरी जोरात केली. हरभरा, गहू तसेच सूर्यफूल ची पेरणी होऊन महिना उलटला तसेच पिकांची जोरात वाढ होत असतानाच पुन्हा अवकाळी पाऊसाने आणि गारपिटीने नुकसान केले त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे. खरीप हंगामातील नुकसान शेतकरी रब्बी हंगामात भरून काढणार होते मात्र या परिस्थितीत हा निर्धार पूर्ण होतोय का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काढणीला आलेली तूरही पाण्यातच :-
खरीप हंगामातील तूर पिकावर फक्त अतिवृष्टीचा च परिणाम झाला असे नाही तर तुरीचे पीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता जे की नंतर त्याची शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे काळजी घेऊन पीक जोपासले तर काही ठिकाणी काढणी सुद्धा सुरू होती. शनिवारी रात्री अचानकपणे अवकाळी पाऊस तसेच गारपिठ झाल्याने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रब्बी जोमात मात्र, रात्रीतून पीके कोमात :-
रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यापासून गहू, हरभरा, सूर्यफूल ही पिके पोषक वातावरणामुळे वाढीस लागली होती. मशागतिचे कामे पूर्ण झाली जे की वातावरण पोषक असल्याने पिके बहरून आली होती पण अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. जे नुकसान भरून निघण्याजोगे नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्याचा निर्धार तरी शेतकऱ्यांनी केला होता मात्र इथेही नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रे भुर्रर्र :-
अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने फक्त शेतीचे च नुकसान केले नाही तर लोकांची सुद्धा तारांबळ झालेली आहे. पाणी साचून राहिल्याने वाफसा निघत नाही त्यामुळे शेतीची कामे थांबून राहिली आहेत. दुसऱ्या बाजूस पाहायला गेले तर वादळी वाऱ्यामुळे नेरपिंगळाई मधील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे तीन पत्रे उडून गेले आहेत. मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यात पाऊसामुळे कापूस, हरभरा, संत्रा, तूरसह सहा पिकाचे अजून नुकसान झाले आहे.
Published on: 10 January 2022, 12:14 IST