News

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून या धरणाकडे पाहिले जाते. धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

Updated on 06 April, 2022 11:44 AM IST

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासात धरणांचे खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून या धरणाकडे पाहिले जाते. धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

१ मे पासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटप

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र दिनापासून येत्या म्हणजे १ मे पासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कोयना धरणाच्या वर्धापनदिनी (ता. १६ मे) प्रातिनिधीक स्वरूपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सोलापूर, सातारा, रायगड जिल्ह्यातील जमीन वाटपाची प्रक्रिया १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून सुरू करावी. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रकल्पग्रस्तांना नोकरी

पात्र प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रमाणित संचालन पद्धती (एसओपी) तयार करून उपलब्ध जमिनीची यादी आणि प्रक्रियेसाठी भरावयाचा अर्ज प्रसिद्ध करण्यात यावा. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे जमिनीचे वाटप करण्यात यावे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आयटीआय प्रमाणपत्रधारक पाल्यांना 'महावितरण' मध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : कारखान्याच्या 2100 सभासदांचे सभासदत्व रद्द, वाचा नेमके काय घडले...
आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (व्हिसीद्वारे), वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, श्रमिक कार्याध्यक्ष संपत देसाई आदी मान्यवरांसह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

English Summary: Dam victims will get their rightful land; Big announcement by Deputy Chief Minister Ajit Pawar
Published on: 06 April 2022, 11:43 IST