पुणे : शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे दुध व्यावसायातून आर्थप्राप्ती होते. शेतकरी तरुण दूध उत्पादन व्यवसायाकडे वळले आहेत. आता प्रत्येकाकडे पशुधन वाढले आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यावसायिक अंगाने दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
दुध व्यावसाय शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा जोडधंदा आहे. राज्यात दुध व्यावसायत विस्तार होत आहे. शेतकरी दुधाचे उत्पादन करतात आणि ते दुध खासगी संस्था आणि सहकारी संस्था विक्री करतात. अशी भूमिका शेतकऱ्यांची ठेवली गेली आहे. शेतकऱ्यांना दूध व्यसायातून पैसे मिळतात, पण अधिक पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन व्यवसायाची माहिती देणे गरजेचे आहे. या उद्धेशाने हे प्रशिक्षण केंद्र सुरु केली जाणार आहेत.
मागील कालखंडात अशी प्रकल्प सुरु व्हयला हवी होते पण तसे झाले नाही. आता मात्र, राहुरी विद्यापीठाने दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थ निर्मितीची प्रशिक्षण केंद्रे उभारण्यास पुढाकार घेणार आहे. शेतकऱ्यांना दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत वर्षांनुवर्षे काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळे या क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले. यामुळे विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र भविष्यात मोलाची भूमिका बजावतेल.
शेतकऱ्यांना जर दुधावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण मिळाले तर प्रक्रिया युक्त पदार्थांच्या विक्रीतून शेतकऱ्याला ३० ते ५० टक्क्यांपर्यंत जास्तीचा नफा मिळू शकतो. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना अत्यावश्यक ठरणारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा राज्यात तयार झालेल्या नाहीत.
राहुरी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्हे येतात. हे जिल्हे राज्याच्या दुग्धोत्पादनात अग्रेसर आहेत. तेथे विशेष प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. पहिले केंद्र कोल्हापूरला उभे राहण्याची चिन्हे आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या कृषी विद्यालयाला विशेष निधी देखील मंजूर केला आहे.
Published on: 13 January 2022, 11:35 IST