Mumbai Dahihandi News :
मुंबईत आज दहीहंडी कार्यक्रम उत्सव जल्लोषात पार पडत आहे. या उत्सवात नृत्यांगणा गौतमी पाटील यांनी हजेरी लावली आहे. मुंबईतील मागठाणे येथे प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने हजेरी लावून ठेका धरला आहे.
मागठाणे येथे प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी विविध अभिनेते, मंत्री यांनी उपस्थिती लावली आहे. याच ठिकाणी गौतमी पाटील हजेरी लावत नृत्य सादर केले आहे. त्यानंतर तीने प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी गौतमी म्हणाली की, "मी याआधी पुण्यात आणि राज्याच्या इतर भागात कार्यक्रम केले आहेत. मुंबईत कार्यक्रमासाठी येऊन खूप छान वाटतंय. मी बरेच ठिकाणी जाते. जिथे जाते तिथे प्रतिसाद दिसतो. इथेही छान वाटलं. मुंबईतही सुरक्षित वाटलं. इतर ठिकाणीही मला सुरक्षित वाटतं"
मुंबईतील मागाठाणे येथे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली आहे. तर नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे.
मुख्यमंत्री ३५ ठिकाणी भेट देणार
मुंबई, ठाणेत दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध ३५ ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदेंचा हा मेगा दौरा असणार आहे.
मुंबईतील घाटकोपरची दहीहंडी खूप प्रसिद्ध आहे. ही दहीहंडी पाहण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी देखील येतात. हे ठिकाण लोकांना आकर्षित करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे फिरायला जाऊ शकता. मुंबईत श्री कृष्ण ध्यान मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे ५० दशक जुने मंदिर आहे. जन्माष्टमीच्या दिवशी अतिशय सुंदर सजावट केली जाते. जन्माष्टमी साजरी करण्यासाठी तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता.
Published on: 07 September 2023, 03:59 IST