News

युद्धामुळे भविष्यात खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासणार असल्याने तसेच यामुळे खतांच्या किमती मोठ्या वाढणार म्हणून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना एक अजिबो गरिब सल्ला दिला आहे. भुसे यांच्या मते, शेतकऱ्यांनी आत्ताच खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा साठा करून ठेवावा. कृषिमंत्र्यांना येत्या खरीप हंगामात खतांची टंचाई होणार असल्याची भीती असल्याने ते खुद्द खतांचा साठा आत्ताच उपलब्ध करून घेण्यासाठी दिल्ली दरबारी रवाना झाले आहेत.

Updated on 18 March, 2022 12:19 PM IST

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या जोरदार युद्धामुळे खाद्यतेलाच्या, तसेच इंधनाच्या किमती वाढू लागल्या आहेत. रशिया मधून खतांसाठी आवश्यक कच्च्या मालाची देखील मोठ्या प्रमाणात आयात होत असते परंतु युद्धामुळे कच्च्या मालाची आयात ठप्प झाली असल्याने येत्या खरीप हंगामात खतांच्या किमती पुन्हा एकदा प्रचंड वाढतील अशी भीती शेतकऱ्यांना तसेच राज्य सरकारला देखील वाटू लागली आहे.

हेही वाचा:-महत्वाचे! खरीप हंगामात खतांचा तुडवडा भासणार, म्हणुन आताच करा 'हा' उपाय; नाहीतर………!

या युद्धामुळे भविष्यात खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासणार असल्याने तसेच यामुळे खतांच्या किमती मोठ्या वाढणार म्हणून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना एक अजिबो गरिब सल्ला दिला आहे. भुसे यांच्या मते, शेतकऱ्यांनी आत्ताच खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा साठा करून ठेवावा.

कृषिमंत्र्यांना येत्या खरीप हंगामात खतांची टंचाई होणार असल्याची भीती असल्याने ते खुद्द खतांचा साठा आत्ताच उपलब्ध करून घेण्यासाठी दिल्ली दरबारी रवाना झाले आहेत. जसे की आपणास ठाऊकच आहे, रशिया आणि युक्रेन युद्धाला जवळपास आता 21 दिवस होत आलेत.

या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाची मंदी नोंदवली गेली आहे एवढेच नाही यामुळे इंधन दरवाढ होण्याची देखील शक्यता आहे. या युद्धाचा कृषी क्षेत्राला देखील मोठा फटका बसणार असल्याचे जाणकार लोकांनी आधीच व्यक्त केले आहे.

महत्वाची बातमी:-मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी एक अनोखे गिफ्ट; मिळणार पाच लाखांचे अनुदान

यामुळे महा विकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, खतनिर्मितीसाठी पोट्याश आणि फॉस्फरस हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे असतात. भारत या दोन घटकांसाठी पूर्णता रशिया आणि बेलारुस वर डिपेंड आहे.

युद्धामुळे या दोन्ही देशातून या कच्च्या मालाची आयात होणे अशक्य आहे. कच्च्या मालाची जर निर्यात झाली नाही तर खतांच्या किमती अधिक वाढणार असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाची बातमी:-Holy Festival: होळी सणाला तब्बल पाच दिवस बाजार समिती बंद; शेतकऱ्यांचे काय?

कृषी मंत्री दादा भुसे यांनी माहिती देताना सांगितले की, भारतात रशिया आणि बेलारुस मधून एकूण आवश्यक खतापैकी सुमारे पंधरा टक्के खत आयात केली जातात. यामुळे सहाजिकच येता खरिपात खतांची दरवाढ होण्याची तसेच खत टंचाईची भीती राज्य सरकारला आहे आणि त्यामुळेच भुसे खरीपात संभावित खत टंचाई भासू नये आणि खतांच्या वाढत्या किमतीवर लगाम घालता यावा यासाठी लवकरच भुसे केंद्राचे खत व रसायन मंत्री मंसुख मंडविया यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जातं आहे.

महत्वाची बातमी:-महत्वाची बातमी! कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार; उपमुख्यमंत्री अजित दादांनी केले स्पष्ट

English Summary: dada bhuse says that fertilizer shortage will be seem in kharif
Published on: 18 March 2022, 12:19 IST