News

उन्हाळा लागला की सर्वप्रथम खवय्यांना ओढ लागते ती आंबे चाखण्याची. उन्हाळ्यात जवळपास सर्वांनाच आंबे खाणे विशेष आवडतात. उन्हाळ्यात आंब्याचे दर आकाशाला गवसणी घालत असतात, मात्र जिभेची हौस पुरवण्यासाठी व हौसेला मोल नसतं या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण चढ्या दराने आंबे खरेदी करतो आणि मोठ्या चवीने खात असतो.

Updated on 30 March, 2022 6:42 PM IST

उन्हाळा लागला की सर्वप्रथम खवय्यांना ओढ लागते ती आंबे चाखण्याची. उन्हाळ्यात जवळपास सर्वांनाच आंबे खाणे विशेष आवडतात. उन्हाळ्यात आंब्याचे दर आकाशाला गवसणी घालत असतात, मात्र जिभेची हौस पुरवण्यासाठी व हौसेला मोल नसतं या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण चढ्या दराने आंबे खरेदी करतो आणि मोठ्या चवीने खात असतो.

आता मार्च महिना निरोप घेत आहे आणि बाजारात फळांचा राजा हापूस चमकू लागला आहे. महाराष्ट्राची विशेषता कोकणाची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला नेहमीच चांगला बाजारभाव मिळत असतो. खरं पाहता देशात वेगवेगळ्या जातीचे आणि प्रकाराचे वेगवेगळे आंबे उपलब्ध असतात. यांच्या दरात वैशिष्ट्याप्रमाणे चढ-उतार असतो. आपण खातो तो आंबा जास्तीत जास्त 500 रुपये किलो किंवा त्यापेक्षाही कमी किंमतीचा हापूस असू शकतो पण आज आम्ही आपणास अशा विशेष आंब्याची माहिती देणार आहोत ज्या आंब्याचे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत.

मध्यप्रदेश मध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या एका विशिष्ट जातीच्या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपयांचा दर मिळत आहे.  ताईयो नो तामागो हा आंबा मध्यप्रदेशमध्ये उत्पादित केला जातो या जातीच्या एका आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल 2 लाख 70 हजार रुपये एवढा दर मिळत आहे. ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे वास्तव आहे. हा आंबा मूळचा जपान या देशाचा आहे असे असले तरी आता या आंब्याची शेती भारतातही होऊ लागली आहे.

या आंब्याची शेती मध्यप्रदेश राज्यातील जबल्पुर जिल्ह्यात बघायला मिळते. या आंब्याला लाखोंच्या घरात दर असल्याने याच्या सुरक्षिततेची देखील लाखमोलाची काळजी घेतली जात आहे. जबलपूर जिल्ह्यातील संकल्प परिहार हे शेतकरी या महागड्या आंब्याचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्याने या आंब्याच्या सुरक्षिततेसाठी तीन सुरक्षारक्षक आणि नऊ श्वान असा ताफा तैनात केला आहे. ताईयो नो तामागो या जातीच्या आंब्याला egg of sun अर्थातच सूर्याचे अंडे असे म्हणून देखील संबोधले जाते.

संकल्प यांच्या आंब्याच्या बागेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी काही अज्ञात भामट्यांनी डल्ला टाकला आणि लाखो रुपयांचा आंबा चोरला. त्यामुळे संकल्प यांनी आपल्या आंब्याच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षकांचा ताफा तैनात केला आहे. या जातीच्या आंब्याचे वजन पूर्ण पिकल्यानंतर जवळपास एक किलो ग्रॅम भरते. पूर्ण पिकल्यानंतर या आंब्याचा कलर फिकट पिवळा आणि लाल असा भासतो.

विशेष म्हणजे जपानमध्ये या आंब्याचे उत्पादन पॉलिहाऊस शिवाय घेता येत नाही, मात्र जबलपूरच्या संकल्प यांनी मोकळ्या रानात या आंब्याचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे. संकल्प आपल्या चार एकर शेतजमिनीवर आंब्याचे उत्पादन घेतात त्यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात सुमारे चौदा जातींची आंब्याची झाडे लावली आहेत. या एवढ्या मोठ्या क्षेत्रात त्यांनी लाखमोलाचा ताईयो नो तामागो अंबा देखील लावला आहे. या आंब्याची संकल्प यांनी सुमारे 52 झाडे लावली असून ते त्यापासून यशस्वी उत्पादन घेत आहेत. संकल्प यांच्या या सोन्यापेक्षा महाग असलेल्या आंब्याची जबलपुर समवेतच संपूर्ण देशात मोठी चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या:-

नोकरीच टेन्शन हवेतच विरणार!! शेतकरी पुत्रांनो 'हा' व्यवसाय बनवेल तुम्हाला सधन

Business Idea: शेतकरी पुत्रांनो "हा" व्यवसाय ठरू शकतो तुमच्यासाठी वरदान; वाचा या विषयी

English Summary: Dad! The price of a mango is three lakh rupees; Mango is given high-tech security
Published on: 30 March 2022, 06:23 IST