काळाच्या बदलानुसार सौर ऊर्जेचा जास्त प्रमाणात वापर करणे आवश्यक झाले आहे. सौर ऊर्जेचा वापर केला तर शेतीमाल वाळविण्यासाठी मदत होते तसेच स्वछ, धूळ विरहित सुकलेला व उच्च प्रतीचा माल आपणास भेटतो. कमी जागेमध्ये फळे, औषधी वनस्पती, घरगुती वाळवणे, धान्य, भाज्या एवढे सर्व पदार्थ वाळविण्याकरिता पुण्यातील अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूटने सोलर ड्रायर तयार केले आहे. हे वाळविण्यासाठी पदार्थला आहे तसा रंग लागतो. जे की त्यामधील पाणी निघून जाते. तसेच ज्यावेळी फळे भाज्या स्वस्त असतात तेव्हा ते यामध्ये वाळवून त्याचा वापर आपण पुन्हा कधीही करू शकतो. जे की यामध्ये वाळविलेले सर्व पदार्थ वर्षभर चांगले राहतात.
सोलर ड्रायर ची रचना :-
१. सोलर ड्राय यंत्र पिरॅमीड आकाराचे आहे. तसेच या यंत्राच्या कप्प्यांवर पांढऱ्या रंगाचे स्वच्छ कापड घालून त्यावर पदार्थ वाळवण्यासाठी ठेवावे. जे की कप्याची रचना करताना खालून वर एक एक असा क्रमाने कपा जोडत येणे गरजेचे आहे.
२. ज्यावेळी तुमचे सर्व कप्पे जोडून होतील त्यानंतर वाळवण ठेवून झाले की या यंत्रावर प्लॅस्टिकचा कव्हर घालणे गरजेचे आहे.तसेच ज्या पदार्थामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते असे पदार्थ खालच्या ट्रेमध्ये ठेवावेत जसे की ते पदार्थ म्हणजे पालेभाज्या कांदा. मात्र ज्या पदार्थामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असनार आहे ते पदार्थ वरच्या ट्रेमध्ये ठेवावेत.
उदा. द्राक्ष, केळी, फळांच्या फोडी.
हेही वाचा:-तुळशीच्या पानात आहेत एवढे आरोग्यदायी गुणधर्म, वाचून थक्क व्हाल.
३. हे सोलार ड्रायर यंत्र मुद्दाम च पिरॅमिडआकाराचे तयार केले आहे यामुळे या यंत्रावर दिवसभर ऊन पडत असते. जे की या सोलर ड्रायर यंत्रावर घातलेल्या काळ्या प्लास्टिक च्या कव्हरमुळे बाहेरची बाहेरील धूळ, केरकचरा, माशा, पक्षी या सर्व गोष्टीपासून सरंक्षण होते.
४. आपण या यंत्राला जो प्लास्टिक चा कव्हर खाली लावलेला आहे त्या जाळीमधून बाहेरची हवा आतमध्ये येते आणि कव्हर च्या वर जे टोक असते त्याला लावलेल्या छोट्या ड्रायर मधून गरम झालेली हवा बाहेर पडते. तसेच या सोलर ड्राय यंत्राला जो खाली लावलेला प्लॅस्टिक चा कागद आहे त्यामुळे धूर, कचरा व किडे आत जाणार नाहीत. असे एका वर एक लावलेल्या कपयामुळे यंत्राच्या कमी जागेत जास्त माल वाळविता हेतो.
हेही वाचा:-शेतकरी बांधवांनी वाढणार डोकेदुखी, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा, वाचा सविस्तर
५. ज्यावेळी वाळविण्याचे काम पूर्ण होते त्यानंतर आपण यंत्र घडी करून देखील ठेवतो. मसाल्याचे पदार्थ किंवा आयुर्वेदिक औषधी तयार करणाऱ्या कारखाना मध्ये मोठ्या प्रमाणावर या सोलार ड्राय यंत्राचा वापर केला जातो. मात्र या यंत्राचा पावसाळ्यात वापर केला जात नाही.
Published on: 29 September 2022, 04:32 IST