News

सध्या चर्चेत असणाऱ्या किंबहुना किनाऱ्यावर धडकण्यासाठी घोंगावत प्रवास करणाऱ्या चक्रीवादळाला हवामान विभागाने तोक्ते असे नाव दिले आहे.

Updated on 15 May, 2021 8:02 PM IST

सध्या चर्चेत असणाऱ्या किंबहुना किनाऱ्यावर धडकण्यासाठी घोंगावत प्रवास करणाऱ्या चक्रीवादळाला हवामान विभागाने तोक्ते असे नाव दिले आहे. या शब्दाचा अर्थ होतो पाल, किंवा Gecko हा पालसदृश प्राणी. बर्मिज भाषेतील हे नाव असून, या वादळामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याचे वारे पश्चिम भारतातील पट्ट्यात वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. सदर चक्रीवादळाचा प्रवास पाहता, १७ मे च्या मध्यरात्री किंवा १८ मे रोजी सकाळच्या सुमारास हे वादळ कधीही गुजरातला धडकणार आहे.

तोक्तेची तीव्रता किती असणार?

'द वेदर चॅनल'च्या वृत्तानुसार, अरबी समुद्रातील काही भागांत तोक्ते अधिक तीव्र दिसेल. दक्षिणपूर्व आणि मध्य अरबी समुद्री पट्टा आणि त्याजवळच्या भागात तोक्तेची तीव्रता अधिक दिसणार आहे. पण, थंड पाणी आणि कोरडी हवा पाहता अरबी समुद्रातील उत्तर भागात या वादळाची तीव्रता कमी होऊ शकते. परंतु आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तुलनेत गुजरात प्रांत चक्रीवादळाशी समरुप नसल्यामुळे येथे त्याचे काही गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून या भागांमध्ये आवश्यकतेनुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनवर या चक्रीवादळाचे काही परिणाम होणार?

तोक्ते चक्रीवादळामुळं मान्सूनचा वेग काहीसा कमी होऊन त्याच्या आगमनास काहीसा विलंब होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. डॉ. श्रीधर बालसुब्रमण्यम यांच्या मते, चक्रीवाळसदृश परिस्थितीमुळं निर्माण होणारे जोरदार वारे मान्सून अगदी तोंडावर असतानाच धडकल्यामुळं त्याच्या प्रवासात अडथळा निर्माण करु शकतात. परिणामी मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही असंच चित्र दिसलं होतं.

 

वादळांच्या बाबतीत अरबी समुद्र मागील काही दिवसांत अधिक सक्रिय होताना का दिसत आहे?

बंगालच्या उपसागराप्रमाणंच मागील काही दिवसांत अरबी समुद्रातही येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढली आहे. यासाठी समुद्र पृष्ठ तापमान, वाऱ्यांचा वेग-दिशा-पोत आणि आर्द्रतेचं प्रमाण कारणीभूत ठरत आहे. ओखी, क्याप, महा, निसर्ग आणि आता तोक्ते हे त्याचेच परिणाम अरबी समुद्राच्या काही भागातील तापमान हे गंभीररित्या अधिक उष्ण होत आहे, याचेही परिणाम या चक्रीवादळांच्या निर्मितीच्या रुपात दिसून येत आहेत.

 

तोक्तेची निर्मिती होण्यास कारणीभूत ठरलेले घटक

- दक्षिणपूर्व अरबी समुद्रातील समुद्र पृष्ठ तापमान
- अॅक्टिव्ह मेडन ज्युलियन ऑसीलेशन
- हायपर अॅक्टिव्ह अॅटमोसपेसिक वेव अॅक्शन
- वाऱ्याचा झोत आणि आर्द्रता

English Summary: Cyclone Tauktae: What does 'Tokte' mean? Learn important information about this hurricane
Published on: 15 May 2021, 08:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)