News

बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 5 मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान विभागानुसार, काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.

Updated on 02 May, 2023 10:23 AM IST

बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 5 मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान विभागानुसार, काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.

तसेच, बंगालच्या उपसागरात असणाऱ्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची माहिती आयएमडीच्या वतीनं देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ (Cyclone) तयार होण्याची शक्यता, ज्याचे नाव मोचा (Cyclone Mocha) असू शकेल. हे चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 मे ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनं शनिवारी रात्री या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला होता. दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होणार असल्याने हे चक्रीवादळ तयार होणार आहे. भारतीय हवामान विभागाने देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होऊ शकते.

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुण्यात पावसाला सुरुवात, दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी...

१२ ते १४ मे रोजी मध्यरात्रीनंतर हे चक्रीवादळ म्यानमारच्या राखीव राज्य आणि बांग्लादेशच्या चट्टोग्राम किनारपट्टीवर धडकू शकते. या चक्रीवादळाचा वेग ताशी १५० ते १८० किमी राहू शकतो. भारताच्या ओदिशा किनारपट्टीला देखील हे वादळ धडकू शकते. या वादळाचे 'मोचा' असे नामकरण यमनने केले आहे.

काय सांगता! गायीने दिला 'सिंहाच्या बछड्याला' जन्म, जबडा आणि पंजा पाहून सर्वच हैराण..

यामुळे पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. सध्या अनेक ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पेरणी यंत्र योजनाद्वारे मिळणार तब्बल "एवढे" अनुदान, असा घ्या लाभ..
जांभळाला किलोला मिळाला ६०० ते ७०० रुपयांचा दर, मागणी वाढली..
१८-० ! धनुभाऊंनी पंकजा ताईंचा अख्खा पॅनलचं पाडला, भाजपला मोठा धक्का

English Summary: Cyclone 'Mocha' will hit the coast, 11th to 15th May will bring rain
Published on: 02 May 2023, 10:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)