News

मॉन्सूनची प्रतीक्षा सुरू असताना अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ३ जूनपर्यंत गुजरातची किनारपट्टीवर आणि उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अरबी समुद्रासाठी रविवारी दुहेरी दाबाचा अलर्ट जारी केला आहे.

Updated on 01 June, 2020 12:45 PM IST


मॉन्सूनची प्रतीक्षा सुरू असताना अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ३ जूनपर्यंत गुजरातची किनारपट्टीवर आणि उत्तर महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अरबी समुद्रासाठी रविवारी दुहेरी दाबाचा अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. दरम्यान आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ  आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढग गोळा होऊ लागले आहेत.

 खात्यानुसार, अरबी समुद्रात २ वादळे आकार घेत असून १ आफ्रिकी किनारपट्टीलगतच्या समुद्रावर आहे. ते ओमान आणि येमेनकडे वळण्याची शक्यता आहे. दुसरे वादळ भारताच्या निकट आहे. ते पुढील २४ तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत

दक्षिण-मध्य गुजरात व सौराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी ११० किमी असू शकतो. मच्छीमारांना ४ जूनपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळाचे केंद्र ओमानजवळ असले तरी त्याचा तडाखा महाराष्ट्र आणि गुजरातला बसू शकतो.  या काळात दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ६५ ते ८५ किलोमीटर प्रती तास असा वाऱ्याचा वेग असेल. हा वेग वाढून ३ जून रोजी सकाळी महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ ९० ते ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान  मुंबईमध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारीही आकाश ढगाळ राहील. तर मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार ३ जून रोजी मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

English Summary: cyclone alert in maharashtra and gujrat; possibility of rain fall in kokan
Published on: 01 June 2020, 12:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)