राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे किती वृक्षप्रेमी आहेत, हे अनेकदा दिसून येते. त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था आणि शाळा याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. ही झाडे जरा कोमजली तरी ते संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करतात. तसेच अनेक ठिकाणी झाडे लावण्याच्या सूचना देखील देतात. असे असताना आता अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या कंपाऊंड बाहेर आलेल्या फांद्या तोडल्यावरून 2 जणांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानी कंपाऊंडच्या आत असलेल्या झाडांच्या फांद्या या कंपाऊंड बाहेर आलेल्या होत्या. फांद्या तोडणी सुरू असल्याचे संतोष वाबळे यांच्या लक्षात येताच त्यांनी कुणाच्या परवानगीने झाडं तोडत आहात असे विचारलं असता त्यांनी दिलीप जगदाळे यांच्या सांगण्यावरून तोडत आहे असं सांगितले. यामुळे हे नंतर लक्षात आले.
या प्रकरणी संतोष वाबळे यांनी वृक्षांच्या फांद्यांची तोड केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झाडे तोडण्याऱ्यांनी फायकस जातीच्या झाडाच्या 20 ते 25 फांद्या तोडलेल्या दिसल्या. त्यावरून संतोष वाबळे यांनी पांडुरंग माने आणि दिलीप जगदाळे यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता बारामती शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास सुरु आहे.
शेतकऱ्यांनो रासायनिकपेक्षा जीवामृतच फायदेशीर, आता घरच्या घरीच करा तयार...
दरम्यान, पोलिसांनी झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. यामुळे आता याकडे लक्ष लागले आहे. अजित पवार बारामतीमध्ये आल्यानंतर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
पांढऱ्या वांग्यातून लाखोंची कमाई, शाळा भरल्या की मागणी हमखास..
सर्वसामान्यांना झटका! गॅस कंपन्यांनी गॅस कनेक्शनबाबत घेतला मोठा निर्णय
राज्यातील 6 कंपन्यांकडून बोगस खताची निर्मिती, केंद्राने दिले फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
Published on: 16 June 2022, 01:57 IST