News

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र आजही कायम आहे. कोरोना व्हायरसमुले जगातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने मागील महिन्यात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये घसरण पाहण्यास मिळाली होती. दरम्यान ओपेक (OPEC-Organization of the Petroleum Exporting Countries) देशांनी ( कच्चा तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना ) क्रुड ऑईलचे उत्पादन घटल्यानंतर किंमतींमध्ये वाढ केली आहे.

Updated on 16 June, 2020 1:35 PM IST


पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र आजही कायम आहे.  कोरोना व्हायरसमुले जगातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने  मागील महिन्यात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये घसरण पाहण्यास मिळाली होती. दरम्यान ओपेक (OPEC-Organization of the Petroleum Exporting Countries) देशांनी  ( कच्चा तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना ) क्रुड ऑईलचे उत्पादन घटल्यानंतर किंमतींमध्ये वाढ केली आहे. ब्रेंट क्रुडचे दर वाढून ३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर भारतातील पेट्रोलच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. दरम्यान विशेषज्ञांच्या मतानुसार, अंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल अजूनही एक लिटर पॅकेज पाण्याच्या बाटलीच्या किंमतीपेक्षा स्वस्त आहे.

सलग दहाव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. आज (मंगळवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांती वाढ करण्यात आली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ही दर वाढ २१ महिन्यामधील सर्वाधिक दर वाढ आहे. 

यापूर्वी सोमवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. सोमवारी पेट्रोलच्या दरात ४८ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८३.६२ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७३.७५ रूपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.३७ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर७३.१७ रूपये प्रति लीटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७८.५५ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७०.८४ रूपये प्रति लिटर झाले आहेत.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसंच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात.मार्च महिन्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या एकसाइज ड्युटीमध्ये ३ रुपये प्रति लिटर मागे वाढवले होते. यानंतर तेल कंपन्यांनी किंमतीमधील टॅक्स वाढवला नाही. यामुळे कंपन्या आता पेट्रोलवर दररोज दर वाढवत आहेत. 

English Summary: customer's budget will collapsed; fuel price rise on tenth day
Published on: 16 June 2020, 01:26 IST