News

खरेदी करताना फसवणूक, शोषण झालेल्या ग्राहकांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा मोठा आधार आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातून फसवणुकी विरोधात न्यायालयात दाद मागता येते, असे मत बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी व्यक्त केले.

Updated on 03 December, 2022 10:04 AM IST

खरेदी करताना फसवणूक, शोषण झालेल्या ग्राहकांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा मोठा आधार आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातून फसवणुकी विरोधात न्यायालयात दाद मागता येते, असे मत बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी व्यक्त केले.

जेजुरी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने आयोजित एक दिवसीय जिल्हा प्रशिक्षण अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भोईटे म्हणाले की ऑनलाइन च्या युगात फसवणुकीची पद्धतही बदलली असल्याने त्यात सुसंगत असा बदल ग्राहक संरक्षण कायद्यात केल्याने त्याचा फायदा सामान्य ग्राहकांना होणार आहे.

पोलीस प्रशासनातील अडचणींसाठी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. सर्वसामान्य व तळागळतील ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत काम करत असून यापुढेही हे प्रवित्र काम जोमाने चालू राहील असा मला विश्वास वाटतो.

पालकांनो मुलांची काळजी घ्या, पुण्यात गोवरचे 5 रुग्ण, प्रशासन सतर्क

यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, केंद्रीय कार्यकारीनी सदस्य धंनजय गायकवाड, प्रांतअध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांत संघटनमत्री प्रसाद बुरांडे प्रांत सचिव संदीप जंगम व प्रातांचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय कार्यकारीणी सदस्य धनंजय गायकवाड यांनी कार्यकर्ता पद व पददायित्व याविषयी मार्गदर्शन केले.

प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी संघटन वाढीसाठी ग्राहक पंचायत कार्यपद्धती व सिद्धांत या विषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सह संघटन मंत्री रमेश टाकळकर यांनी ग्रामीण ग्राहकांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन केले. ॲड तुषार झेंडे पाटील यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा याविषयी मार्गदर्शन केले.

अखेर राज्यपालांच्या हकालपट्टीचा मुहूर्त ठरला? शिवछत्रपतींचा अवमान केल्यामुळे होणार कारवाई

मध्य महाराष्ट्र संघटनमंत्री प्रसाद बुरांडे व पुरंदर च्या तहशिलदार श्रीमती रुपाली सरनोबत यांचेही मार्गदर्शन झाले. स्व. संतोष (बापू) गांधी यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ठ कार्यक्षम अधिकारी, कार्यक्षम तालुका व उत्कृष्ठ काम करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या वतीने यशोगाथा कार्यकर्त्याच्या कामाची या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर, संघटनमंत्री भानुदास सरडे, कोषाध्यक्ष राघवदास चौधरी, उपाध्यक्ष अशोक भोर, सचिव संतोष शिर्के, महिला संघटक वैशाली अडसरे, लता कुंभार, पुरंदर तालुका पालक दिलीप बेंद्रे, प्रसाद अत्रे, गोरक्ष लामखडे, तुकाराम फराटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या;
बारामतीकरांनो आता वेगावर ठेवा मर्यादा! स्पीडगन ठेवणार तुमच्यावर लक्ष, दोन हजारांपर्यंत दंड
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Sugarcane FRP: ‘किसन वीर’ कारखान्याची २५०० पहिली उचल

English Summary: Customer Panchayat support oppressed Upper Superintendent Police Anand Bhoite
Published on: 03 December 2022, 10:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)