आता शेतीचे स्वरुप बदलत आहे. ज्यामधून अधिकचे उत्पादन त्याची लागवड असाच प्रयत्न आता शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे औषधी वनस्पतीवर भर दिला जात आहे. या वनस्पती उपयोगीही पडत आहेत आणि त्यामधून उत्पन्नही मिळत आहे.
सर्पगंधक ही वनस्पती त्यापैकीच एक आहे. तर अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्या ( exports from India,) भारतात सर्वात जास्त उत्पादित केल्या जातात आणि जगातील बऱ्याच देशांमध्ये निर्यात केल्या जातात.इसबगोल ही सुद्धा अशीच वनस्पती आहे. एकट्या भारत देशामध्ये एकूण उत्पादनाच्या 80 टक्के उत्पादन होत आहे. औषधी पिकांच्या निर्यातीत इसबगोल प्रथम क्रमांकावर आहे. दरवर्षी इसबगोलची निर्यात ही 120 कोटी रुपयांची होते. या औषधी वनस्पतीचे इराण, इराक, अरब अमिराती, भारत आणि फिलिपाईन्स हे जगातील प्रमुख उत्पादक आहेत. भारतात गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर इसाबगोलची लागवड करतात.
प्रति क्विंटल 10,000 रुपये
रबी हंगामात म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इसबगोलची लागवड केली जाते आणि मार्च महिन्यापर्यंत याला पीक लागते. त्याची झाडे हळूहळू वाढतात आणि हाताने ते काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. एक वेळेस लागवड केल्यावर कमीत कमी एकरी 4 क्विंटल उत्पादन मिळते. सध्या एक क्विंटलचा दर 10, 000 रुपये आहे.
एका हेक्टरमध्ये इसबगोलचे 15 क्विंटल बियाणे मिळते. याशिवाय हिवाळ्यात इसबगोलच्या किंमती वाढतात, ज्यामुळे उत्पन्न आणखी वाढते. इसबगोलच्या बियाण्यावर प्रक्रिया केली तर ती अधिक फायदेशीर ठरते. या प्रक्रियेनंतर इसबगोलच्या बियांपैकी सुमारे 30 टक्के बिया भुसा तयार करतात आणि हा इसबगोलचा सर्वात महागडा भाग मानला जातो.
Published on: 07 November 2021, 05:16 IST