News

शेतकऱ्यांबाबत रोज काहींना काही घडत असते. अनेकदा त्यांना न्याय मिळत नाही. आता असेच काहीसे घडले आहे. सांगली जिल्ह्यातील भोसे जाधव वस्तीवरील शेतकऱ्यांना आपली व्यथा सांगताना आश्रू अनावर झाले. स्टोन क्रशरच्या धुळीमुळे त्यांचे हात तोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. अनेकांनी तर आपली पिके काढून टाकली आहेत.

Updated on 24 November, 2022 2:12 PM IST

शेतकऱ्यांबाबत रोज काहींना काही घडत असते. अनेकदा त्यांना न्याय मिळत नाही. आता असेच काहीसे घडले आहे. सांगली जिल्ह्यातील भोसे जाधव वस्तीवरील शेतकऱ्यांना आपली व्यथा सांगताना आश्रू अनावर झाले. स्टोन क्रशरच्या धुळीमुळे त्यांचे हात तोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. अनेकांनी तर आपली पिके काढून टाकली आहेत.

यामुळे त्यांच्यावर मोठे संकट आले होते. याची माहिती घेण्यासाठी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी शेतात पोहचले. तेव्हा पीडित शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली. तेव्हा शेतकऱ्यांना आश्रू अनावर झाले. त्यावेळी एका शेतकऱ्याने थेट अधिकाऱ्याचे पायच धरले आणि जीवाचं बरं वाईट करण्याचा इशारा दिला. तर महिलांनी आक्रोश केला.

गेल्या तीन चार वर्षांपासून शेतकरी क्रेशर बंद करण्याची मागणी करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदूषण विभाग खाडकन जागा झाला. आणि अधिकरी याची पाहणी करण्यासाठी आले. दरम्यान प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेती आणि स्टोन क्रशरचा पंचनामा केला.

गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही, कारखान्यावर कारवाई करा

यामध्ये स्टोन क्रशरच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. याविषयीचा अहवाल तयार करुन तो पुढे पाठविला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे येथील 85 एकर शेतीचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्वसामान्य लोकांना झटका! विजेच्या दरात होणार वाढ..

याचा विडिओ व्हायरल झाला होता, शेतातील कडधान्य, द्राक्ष बाग, भाजीपाला मातीमोल झाला आहे. प्रशासन दखल घेत नसल्याच्या नाराजीने शेतकऱ्यांनी यासंबंधीचा व्हिडिओ काढला होता. हा विडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, यानंतर अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली, आता काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! बीजिंग, झेंगझोऊमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
मशरूम गर्ल! नोकरी सोडून मशरूमची शेती, आता करोडोंची उलाढाल
रात्री 6 ते 8 वाजेपर्यंत गावात मोबाईल, टीव्ही बंद, मुलांच्या अभ्यासासाठी गावाचा मोठा निर्णय

English Summary: Crying profusely, farmers directly held feet officials,
Published on: 24 November 2022, 02:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)