सर्वसामान्य लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सकाळी प्रतिबॅरेल 107 डॉलरवर पोहोचलेले ब्रेंट क्रूड शुक्रवारी प्रतिबॅरेल 104 डॉलरवर पोहोचले आहे.
कच्च्या तेलाचे दर कमी होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जारी केले आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीही आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत.
आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.
मोठी बातमी: 'या' योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 50 % अनुदान
आजची ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 104.2 डॉलर इतकी होती, तर WTI प्रति बॅरल 96.48 पर्यंत घसरली. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरच्या वर गेल्या होत्या. आता कच्चे तेल 100 डॉलरच्या जवळ असताना, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
अलर्ट ! राज्यात उद्यापासून कोकण मुंबईसह 'या' ठिकाणी चार दिवस मुसळधार पाऊस
पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.
दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.
चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.
कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी ; पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता येणार 'या' तारखेला
धक्कादायक ! 'या' योजनेच्या 9 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा
वातावरणामुळे ऊस पिकाचे नुकसान; तर त्वरित उसावरील पाकोळी किडीचे करा व्यवस्थापन
Published on: 22 July 2022, 01:04 IST