News

ड्रोनच्या साह्याने फवारणी तसेच सर्वेक्षण करण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने ड्रोनच्या वापराविषयी ची कार्यपद्धती ठरवून दिली आहे. त्या कार्यपद्धतीनुसार केलेल्या प्रयोगांमध्ये निष्कर्ष निघाले आहेत की फवारणीसाठी जर ड्रोनचा वापर केला तर कीटकनाशकांच्या वापरामध्ये येत्या काळात 50 टक्के बचत होईल.

Updated on 18 January, 2022 9:44 AM IST

ड्रोनच्या साह्याने फवारणी तसेच सर्वेक्षण करण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने ड्रोनच्या वापराविषयी ची कार्यपद्धती ठरवून दिली आहे. त्या कार्यपद्धतीनुसार केलेल्या प्रयोगांमध्ये निष्कर्ष निघाले आहेत की फवारणीसाठी जर ड्रोनचा वापर केला तर कीटकनाशकांच्या वापरामध्ये येत्या काळात 50 टक्के बचत होईल.

जास्त कीटकनाशक वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या ड्रोनची किंमत कमी करण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठात प्रयोग सुरू असून त्यासाठी अमेरिकेहून साहित्य मागवण्यात आले आहे. यादरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रयोग म्हणून केलेल्या एका एकर मध्ये फवारणी नंतर पाणी आणि किटकनाशक यामध्ये मोठी बचत होत असल्याचा दावा या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केला आहे.

 जे ड्रोन दहा लिटर कीटकनाशक फवारणी साठी वापरले जातील त्याची किंमत सहा ते आठ लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान परवडणारे नाही. ड्रोनच्या रचनेमध्ये काही बदल करण्याचे संशोधन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडून सध्या सुरू आहे.

महाराष्ट्रात प्रतिवर्षी अकरा ते बारा हजार टन कीटकनाशक यांचा वापर केला जातो. कृषी तंत्रज्ञान आत करण्यात येणाऱ्या या प्रयोगासतसेच ड्रोनच्या वापरास केंद्र सरकारने देखील मान्यता दिली आहे. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह यांनीदेखील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मार्फत प्रत्यक्ष फवारणीचे प्रयोग केले.25 किलो वजन असलेल्या ड्रोन साठी 3 बॅटरी सेट च्या साह्याने हरभरा पिकावर फवारणी करण्यात आली. ड्रोन द्वारे जेव्हा फवारणी चालू असते तेव्हा वाऱ्याचा वेग वाढतो त्यामुळे पिक हालत राहते. तसेच ड्रोनचे नोझल 360 अंशात फिरत असल्याने सर्वत्र फवारणी होते. त्यामुळे औषध वपाण्याच्या द्रव्याचे फवारे हे खूप सूक्ष्म होतात.

त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. केंद्राने दिलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार  राष्ट्रीय कीटकनाशक फवारणी च्या सूत्रानुसार फवारणी करावी असे सुचवण्यात आले आहे. परंतु येणाऱ्या काळात कमीत कमी कालावधीमध्ये पिकांच्या आजारावरील योग्य उपचार करण्यासाठी ड्रोन चा उपयोग वाढण्याची शक्यता आहे. ड्रोनचा वापर कोणाला करता येईल यासाठी चे नियम व दोन वापराच्या मंजुरी विषयीचे नियम केंद्र सरकारने डिसेंबरमध्ये जारी केल्यानंतर हा पहिलाच प्रयोग आहे.

 ड्रोन फवारणी हे प्रशिक्षित मनुष्यबळाची काम असून ड्रोन वैमानिक होण्यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रशिक्षण देखील घेतले जाणार आहेत.

त्यामुळे येणाऱ्या काळात शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढू शकतो. फक्त मजूर आणि ड्रोन यातील खर्चाची तफावत कमी करण्याची गरज आहे. सध्या चार फवारणीसाठी प्रति व्यक्ती प्रति एकर खर्चाचा विचार केला तर तो तीनशे रुपये आहे. तर ड्रोनच्या साह्याने तो खर्च दुप्पट आहे. त्यासाठी अधिक कीटकनाशके वाहून येणारा ड्रोन व त्याची बॅटरी या क्षेत्रामध्ये संशोधन होण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते.(स्त्रोत-लोकसत्ता)

English Summary: crop sprying to with drone we can save fifty percent pesticide and water
Published on: 18 January 2022, 09:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)