News

परतीच्या पावसाने (rain) राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) चांगलेच अडचणीत आणले आहे. खरीप पिकांच्या (Kharip Crop) काढणीवेळी आलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.

Updated on 30 October, 2022 2:28 PM IST

परतीच्या पावसाने (rain) राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) चांगलेच अडचणीत आणले आहे. खरीप पिकांच्या (Kharip Crop) काढणीवेळी आलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) मराठवाड्यात यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे 12 लाख 49 हजार 731 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उरलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मराठवाड्यात (Marathwada) सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

एकूण २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकरी बाधित झाल्याचे सांगण्यात आले. नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांची मदत लागणार आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्राकडे मदत मागणार

सोयाबीन आणि कपाशीचे अधिक नुकसान झाले

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने बहुतांश सोयाबीन आणि कपाशीची शेती (Cotton Crop) उद्ध्वस्त झाली आहे.मराठवाड्यातील शेतकरी सर्वाधिक सोयाबीनची (Soyabean) लागवड करतात. येथील शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. शेतात तयार झालेले पीक वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीन हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक मानले जाते.

अतिवृष्टीमुळे या पिकांचे नुकसान झाले आहे

यंदा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात 727 मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा 911 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच अंदाजित सरासरीपेक्षा जास्त पाऊस. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, मूग, तूर, हंगामी भाजीपाला, फळे या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

यावर्षी सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे.तसेच गतवर्षी कापसाचा विक्रमी दर पाहता यावर्षीही शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर भर दिला होता. मराठवाड्यातील शेतकरी सोयाबीनच्या लागवडीवर अधिक अवलंबून आहेत. असे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने पुरेशी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

खर्च कमी नफा जास्त! खते-कीटकनाशक नाही, या 4 गोष्टींनी करा पर्यावरणपूरक शेती

या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झाले आहे

औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख 79 हजार 56 शेतकऱ्यांच्या 4 लाख 43 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यात 7 लाख 87 हजार 799 शेतकऱ्यांच्या 4 लाख 78 हजार 327 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यात 5 लाख 67 हजार 826 शेतकऱ्यांच्या 3 लाख 88 हजार 922 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
परभणी जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांच्या 2 लाख 19 हजार 105 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात 54 हजार 876 शेतकऱ्यांच्या 12 हजार 360 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
नांदेडमधील 49 हजार 885 शेतकऱ्यांची 21 हजार 500 हेक्टर शेतजमिनीतील पिके गेली.
लातूर जिल्ह्यात १६ हजार ९४८ शेतकऱ्यांचे १४ हजार ९४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 2 लाख 59 हजार 19 शेतकऱ्यांच्या 1 लाख 91 हजार 579 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.

महत्वाच्या बातम्या:
नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सर्वसामान्यांना बसणार झटका! गॅसच्या किमती वाढणार?
EPFO: खुशखबर! नोकरी करणाऱ्यांना मिळणार 7 लाख रुपये; असा घ्या या सरकारी योजनेचा लाभ

English Summary: Crop loss on 17 lakh hectares in Marathwada; Soybean and cotton crops were hit hard
Published on: 30 October 2022, 02:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)