News

शेतकऱ्यांना जेव्हा खरीप पिकाचे कर्ज पाहिजे असते तेव्हा सर्वात पुढे जी बँक असते ती जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याकडे जेवढ्या खाजगी किंवा राष्ट्रीय बँका आहेत त्यांनी कर्ज देण्यास हात आखडल्यामुळे कर्ज वाटपाची आकडेवारी पुढे सरकत नाही.

Updated on 22 June, 2021 9:26 PM IST

शेतकऱ्यांना जेव्हा खरीप पिकाचे कर्ज पाहिजे असते तेव्हा सर्वात पुढे जी बँक असते ती जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याकडे जेवढ्या खाजगी किंवा राष्ट्रीय बँका आहेत त्यांनी कर्ज देण्यास हात आखडल्यामुळे कर्ज वाटपाची आकडेवारी पुढे सरकत नाही.

शेतकऱ्यांना बँक कर्ज देण्यास टाळत आहे:

सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप पीक लावण्यासाठी कर्ज मागणी मोठी असते तसे पाहायला गेले तर सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिके घेतली जातात पण खरीप हंगामात सुद्धा शेतकरी पिके घेतात.त्यामुळे शेतकऱ्यांना तर बँक कर्ज उपलब्ध करून देते पण जेव्हा कर्ज माघारी करण्याची वेळ येते तेव्हा शेतकरी अनुत्सुक असतात त्यामुळे सध्या बँका सुद्धा कुठेतरी कर्ज देण्यास हात अकडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे कर्तव्य केले असून मागील आठवड्यापर्यंत १८ हजार ४० शेतकऱ्यांना १३२ कोटी ९० रुपये कर्ज वाटप केले आहे.

हेही वाचा:डाळीसंबंधित केंद्र सरकारचा मोठा निर्णय,राज्य सरकारांबरोबर चर्चा

खरीप हंगामाच्या पिकांची कर्ज घेण्याची मुदत फक्त सप्टेंबर पर्यंत आहे.दरवेळी सारखी मध्यवर्ती बँकांनी आघाडी घेतले पण खाजगी आणि राष्ट्रीय बँक चे कर्ज देण्याची प्रक्रिया खूप हळुवार चालू आहे. मध्यवर्ती बँकेनंतर कर्ज वाटपाच्या ज्या बँकेचा नंबर  लागतो ती बँक ऑफ इंडिया आहे जे की ६ हजार ३५४ शेतकऱ्यांना ८० कोटी ९८ लाख रुपये कर्ज वाटप केले असून एकूण सरासरी  २९.२१ टक्के आहे. तिसरा नंबर लागतो ती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, जे की २ हजार ५३५ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला असून ५४ कोटी ९० लाख रुपये एवढे कर्ज वाटप केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ची एकूण टक्केवारी २६.७२ आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ने दोन हजार ४०९ शेतकऱ्यांना ४९ कोटी ६१ लाख रुपये कर्ज दिले आहेत तसेच एचडीएफसी बँकेने १९ कोटी, कॅनरा बँक २० कोटी, विदर्भ कोकण बँक १४ कोटी आणि बँक ऑफ बडोदा ने २७ कोटी रुपये एवढे कर्ज दिले आहेत. 

राष्ट्रीय, खाजगी तसेच सहकारी बँकांना खरीप हंगामातील पिकांसाठी एक लाख २० हजार २७९ शेतकऱ्यांना १२७० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले असून या बँकांनी या अडीच महिन्यात ३३ हजार १०२ शेतकऱ्यांना ४४५ कोटी ४६ लाख एवढे कर्ज वाटप केले आहे. सोलापूर जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेने मंगळवेढा आणि सांगोला तालुका वगळता २७५ शेतकऱ्यांना कर्ज  दिले आहे, तसेच तांत्रिक अडचणी आली असून ती अगदी लवकर सोडवून जिल्हा मध्यवर्ती बँकेने १३ शेतकऱ्यांना २२ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे.

English Summary: Crop loans have not been pushed forward due to the reluctance of national and private banks
Published on: 22 June 2021, 09:26 IST