सध्या शेतकरी पावसाची वाट बघत असून मान्सून आला की शेतीच्या कामाची तयारी करत आहेत. तसेच बँकांकडून कर्ज घेत आहेत. आता खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीककर्ज घेता येणार आहे.
असे असताना मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी एकाच महिन्यात १ हजार ३०१ कोटी १४ लाख ५४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
जिल्ह्यातील कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ६८.८४ टक्के इतके पूर्ण झाले आहे. यामुळे या बँकेने आघाडी घेतली आहे. या बॅंकेकडून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होत आहे.
शेतकऱ्यांना केवळ 1 रूपयात मिळणार पीकविमा, जाणून घ्या...
त्यानंतर सातारा जिल्हा बॅंकेनेही हाच उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरू केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने यंदा १ हजार ८९० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यावर्षीचा पाऊसकाळ कसा असणार? जाणून घ्या, भारतीय हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती...
यानुसार जिल्ह्यातील मागेल त्या पात्र शेतकऱ्यांना या पीककर्जाचा लाभ दिला जाणार आहे. शिवाय यावर्षीही तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी शून्य टक्के व्याजाची योजना सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय.
उसाची शेती करताना माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करू नका...
आता पीक कर्जासाठी 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार
शिमला मिरचीने केले मालामाल, पैठणच्या शेतकऱ्याला लाखोंचे उत्पादन..
Published on: 11 May 2023, 09:28 IST