News

मालेगाव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पिक विमा मिळालेलाच नाही, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचे अतोनात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही.

Updated on 10 July, 2021 7:33 PM IST

 मालेगाव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पिक विमा मिळालेलाच नाही, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचे अतोनात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही.

 मागील पीक विम्याची प्रतीक्षा असल्याने आता नवीन पीक विमा काढावा की नाही असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. पिक विमा योजना अंतर्गत जसे की पुरेसा पाऊस न पडणे, गारपीट, ओला दुष्काळ किंवा पिकांवर कीड पडणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते.

 नाशिक जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 साठी लागू करण्यात आली असून संबंधित योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे

 या योजनेत खरीप ज्वारी, मुग, उडीद, तुर, कापूस आणि मका पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा जिल्ह्यात राबवण्यात मागे उद्देश आहे की, यांना त्यांच्या शेतमालाच्या अनिश्चित उत्पन्नाचे नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी. खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा  जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहणार आहे. सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ आधी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित  उत्पन्नामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहणार आहे. ज्या जोखीम टाळता येत नाहीत त्या जोखमीच्या पिकांच्या उत्पादनात येणारी घटी पासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते.

 

 मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मार्च, एप्रिल ची पिक विमा रक्कम दोन टप्प्यात मिळाली. अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. पिकाचे नुकसान झाल्यास नियमानुसार 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. ही अट रद्द करावी अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे. दाभाडी, सोनज, चिखल ओहोळ, हाताने अशा अनेक गावातील शेतकरी पिक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी. अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

 स्त्रोत - लोकसत्ता

English Summary: crop insurence not receive to malegaon taluka farmer
Published on: 10 July 2021, 07:33 IST