या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगाम 2019 करीता शेतकऱ्यांना पीक विमा साठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्यात आलेल्या असून त्या जिल्ह्यांमध्ये त्या मंडळाला 25 टक्के वाटप करण्यात आले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर काहींना अद्याप पर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत.
पिक विमा च्या बाबतीत प्रशासनाचे म्हणणे…..
ज्या शेतकऱ्यांची पिक विमा आलेला नाही असे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी निवेदने घेऊन ते देताना दिसत आहेत. अशीच काही परिस्थिती राज्यभरात निर्माण झाली असून परभणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून पीक विम्याचे सद्यस्थिती वर्तवण्यात आली आहे. जर पिक विमा वाटपाचा विचार केला तर 18 डिसेंबर 2021 पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात आला आहे. उरलेल्या विमा वाटपाची प्रक्रिया कंपन्यांकडून चालू आहे.
कोणते शेतकरी असतात पीक विमा साठी पात्र?
नुकसानीची पूर्वसूचना हि 72 तासांच्या आत देणे बंधनकारक आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली होती त्यांनाच पिक विमा लागू झालेला आहे. आता जो काही पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. तो फक्त ज्या शेतकऱ्यांनी पूर्वआणि पूर्व सूचना देण्याचा कालावधीनुसार पिक विमा वाटपसूचना दिलेले होते अशा शेतकऱ्यांनाच मिळत आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी तक्रार दिली होती तसेच त्यांना त्यांच्या पिकाच्या वाढीची अवस्था, पिकांची झालेली नुकसानीची टक्केवारी आणि पूर्व सूचना देण्याचा कालावधीनुसार पिक विमा वाटप होत आहे.
पूर्व सूचना दिलेल्या शेतकऱ्यांचे काय?
ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना दिली नव्हती अशा शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित महसूल मंडळ निहाय नुकसान भरपाई लागू झाल्यास पीक विमा वाटप करण्यात येईल. नुकसानीचे सूचना दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पिक विमा मिळाला नाही त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर पिक विमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
राज्यातील परिस्थिती…
अशी परिस्थिती राज्याच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आशा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू आहे. परंतु यामध्ये काही समस्या निर्माण होत आहेत जसे की, काही ठिकाणी शेतकऱ्यांचा आय एफ एस सी कोड बदलला गेला असेल तर काही शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर चुकीचा झालेला आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून याबद्दलची दुरुस्ती किंवा माहिती करून घ्यावी. जेणेकरून तुमचा मंजूर झालेला पिक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली नसेल अशा शेतकऱ्यांना त्यांचा पीक कापणी चा अंतिम अहवाल येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत आपल्याला पिक विमा मिळू शकत नाही.
(संदर्भ-TkNews24)
Published on: 16 December 2021, 09:33 IST