News

ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेला पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही नुकसान भरपाई करण्यासाठी मोदी सरकार या महिन्याच्या २० तारखेपर्यंत १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करु शकते, याविषयीची शक्यता वर्तवली जात होती.

Updated on 02 April, 2020 3:10 PM IST


ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेला पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.  ही  नुकसान भरपाई करण्यासाठी मोदी सरकार या महिन्याच्या २० तारखेपर्यंत १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करु शकते, याविषयीची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सरकार आता लॉकडाऊनच्याच दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.  २०१९ च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. याची नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणी अनेक शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती.

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत १० हजार कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.  दरम्यान विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी, असा दबाब सरकारकडून विमा कंपन्यांवर टाकला जात आहे.   लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  रब्बीच्या पिकांची काढणीही शेतकरी करु शकत नाहीत.  यामुळे सरकार लवकरच पिकांच्या नुकसानीचा पैसा देण्याच्या विचाराधीन आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पीक विम्याचा अहवाल अंतिम स्थिती आला असून लवकरच विम्याचा पैसा शेतकऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यासाठी काही दिवासांपुर्वी ४ हजार ५०० कोटी रुपये देण्यात आले होते.  कृषी विभागानुसार महाराष्ट्राला ८०० कोटी किंवा १००० कोटी रुपये दिले जातील. यासह मध्यप्रदेशासाटी २ हजार ५०० ते ३ हजार कोटी रुपये, कर्नाटकासाठी १ हजार ५०० कोटी रुपये, राजस्थानसाठी १ हजार २०० कोटी आणि आंध्रप्रदेशासाठी ८०० ते १००० कोटी रुपये दिले जातील.

English Summary: crop insurance scheme : 10 thousand crore rs transfer in farmers account
Published on: 02 April 2020, 03:07 IST