परभणी
परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ.रत्नाकर माणिकराव गुट्टे यांच्यावतीने पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा खरीप पीकविमा अर्ज मोफत भरुन देण्यात येत आहे. आमदार गुट्टे यांच्या तालुक्यातील संपर्क कार्यालयात अद्यावत संगणक प्रणाली द्वारे हा पीकविमा भरुन देण्यात येत आहे.
सध्या सगळीकडे प्रधानमंत्री खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी महा-ई सेवा केंद्रात शेतकरी गर्दी करत आहेत. तसंच आपले सरकार केंद्रावर देखील शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. मात्र याठिकाणी शेतकऱ्यांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांतील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार गुट्टे यांनी त्यांच्या संपर्क तालुका कार्यालयात पिकविमा भरण्यासाठी अद्यावत यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन पिकविमा भरुन घ्यावा, असे आवाहन आमदार गुट्टे काका मित्र मंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष गणेशराव कदम यांनी केले आहे.
पीएम किसान पिकविमा योजना काय आहे?
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ योजना सुरु करण्यात आली आहे.
Published on: 18 July 2023, 11:33 IST