News

Crop Insurance :- सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडला असून खरिपातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या कालावधीमध्ये पिकांवर विपरीत परिणाम होऊन येणाऱ्या काळात उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्तीत जास्त बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेल्या आहेत. अजून देखील पावसाची चिन्हे नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्व दूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Updated on 28 August, 2023 9:07 AM IST

 Crop Insurance :- सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडला असून खरिपातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या कालावधीमध्ये पिकांवर विपरीत परिणाम होऊन येणाऱ्या काळात उत्पादनात घट होण्याची शक्यता जास्तीत जास्त बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेल्या आहेत. अजून देखील पावसाची चिन्हे नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्व दूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

परंतु तोपर्यंत खरिपाच्या पिकांची स्थिती अतिशय वाईट होण्याची शक्यता आहे. याचा अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे अशा शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबीअंतर्गत संभाव्य विमा भरपाईतून 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्याच्या बाबतीत राज्यातील काही ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या असून त्याच बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट परभणी जिल्ह्यासाठी समोर आली आहे.

 परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यातील 11 मंडळांमध्ये 21 ते 22 दिवसाचा सलग पावसाचा खंड

 या हंगामातील 29 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पालम, जिंतूर आणि पूर्णा या सात तालुक्यातील जवळजवळ 11 मंडळांमध्ये सलग 21 ते 22 दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे सोयाबीनच्या या हंगामाच्या उत्पादनामध्ये मागील सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत तब्बल 64 ते 67% पर्यंत घट अपेक्षित आहे.

त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम अंतर्गत सोयाबीन पिकाकरिता ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य विमा भरपाई रकमेतून 25% आगाऊ रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा पिक विमा योजना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी 25 ऑगस्टला अधीसूचना काढून विमा कंपनीला दिले आहेत.

पाहणी अहवाल सादर

 पिक विमा योजनेच्या मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार आता परभणी जिल्ह्यातील अधिसूचित विमा क्षेत्र या घटकातील सोयाबीन या अधिसूचित पिकाच्या पिक परिस्थिती अहवाल तसेच पर्जन्यमान अहवाल,

स्थानिक प्रसार माध्यमांचे वार्तांकन तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थिती इत्यादी प्रातिनिधिक सूचकांच्या आधारावर आता राज्य शासनाच्या अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला आहे व या पाहणीमध्ये सिंगणापूर,दैठणा, जिंतूर तसेच सेलू, मानवत तालुक्यातील केकरजवळा, पाथरी, बाभळगाव, पालम तालुक्यातील रावराजुर, पेठ शिवणी आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस आणि लिमला या अकरा मंडळातील सोयाबीनचे जे काही अपेक्षित उत्पादन आहे ते मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनांच्या तुलनेत 50% पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. 

त्यामुळे आता आयसीआयसीआय लोम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्या कंपनीने ही अधीसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे अशा सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

English Summary: Crop Insurance: Farmers in this district will get advance amount of insurance compensation
Published on: 28 August 2023, 09:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)