News

महाराष्ट्रात बळीराजाला ह्यावर्षी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आधी वेळेवर पाऊस पडला नाही म्हणुन पश्चिम महाराष्ट्र, खान्देश तसेच इतर भागातील शेतकरी चिंतेत सापडला. पाऊस आल्यावर पावसाने रौद्र रुप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पिकांवर रोगाचे सावट आले आणि शेतकऱ्यांची सर्वच बाजूने नुकसान झाले

Updated on 27 October, 2021 12:46 PM IST

महाराष्ट्रात बळीराजाला ह्यावर्षी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आधी वेळेवर पाऊस पडला नाही म्हणुन पश्चिम महाराष्ट्र, खान्देश तसेच इतर भागातील शेतकरी चिंतेत सापडला. पाऊस आल्यावर पावसाने रौद्र रुप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पिकांवर रोगाचे सावट आले आणि शेतकऱ्यांची सर्वच बाजूने नुकसान झाले

 आता ह्या अडचणीत अजून भर पडली आहे आता शेतकऱ्यांना जंगली जाणवरांमुळे हानी होत आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात जंगली जनावरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. पावसापासून कसेबसे बळीराजाने आपले सोन्यासारखे पिक वाचवले आहे आणि ह्या पिकांची आता जंगली जनावरे नासधूस करत आहेत, त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. जंगली जनावरांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील पपई व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगली जनावरे रोज केळीच्या व पपईच्या बागात घुसून थैमान घालत असतात आणि पिकाला मोठी हानी पोहचवतात.

 परिस्थिती एवढी भयंकर आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अभय श्रीहर कटेहार यांचे तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे त्यांनी आपल्या 3 एकर शेतात पपई लागवड केली आहे. पावसापासून मोठ्या हिमतीने आणि अपार कष्ट व खर्च करून त्यांनी आपले सोन्यासारखे पिक वाचवले पण जंगली जाणवरांनी मात्र पिकांचे पार नुकसान केले शेवटी नाईलाजाने अभय यांनी डीएम ला पत्र लिहून गांजाच्या शेतीसाठी परवानगी मागितली.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी वन्य प्राण्यांमुळे लाखो रुपयांच्या शेतीचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी खुप चिंतेत सापडतो. येथील केळापूर येथील किन्ही गावातील केळी व पपई उत्पादक शेतकरी अभय श्रीहरी काटेवार यांनी यावर्षी केळी आणि पपईची पाच-पाच हजार रोपे लावले आहेत आणि मोठया कष्टाने त्यांची निगा घेतली आणि वाढवले. मात्र त्यांच्या वावराशेजारी जवळच्या जंगलात राहणारे सारस, डुक्कर यांसारखे प्राणी दररोज त्यांच्या शेतात घुसून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. काटेवार यांच्या पपई व केळी बागेतील जवळपास 3500 झाडे वन्य प्राण्यांनी नष्ट केली आहेत. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

 

अभय ह्यांनी आपल्याला नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच वन्य प्राण्यांना कंट्रोल करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी शासनाकडे मागणी केली. परंतु शासनाने फक्त पंचनामा केला ह्याव्यतिरिक्त कुठलीच मदत अभय ह्यांना मिळाली नाही त्यामुळे त्यांनी शासनाकडे गांजा शेतीची परवानगी मागितली आहे त्यासाठी त्यांनी डीएम ला पत्र देखील लिहले आहे.

 माहितीस्रोत टीव्ही9भारतवर्ष

English Summary: crop destroye in yavtamaal district due to attack wild animal
Published on: 27 October 2021, 12:46 IST