पन्नास लाख हेक्टरपेक्षा जास्त परिसरातील पिकांचे नुकसान; सरकारकडे शेतकऱ्यांच्या नजरा

23 October 2020 03:15 PM


राज्यात झालेल्या अतिपावसामुळे  पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान या नुकसानीचा पंचनामा केला जात आहे. राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा करताना केवळ ऑक्टोबर महिनाच नाही तर जूनपासून वेळोवेळी झालेली हानी गृहीत धरली जात आहे.त्यामुळे एकूण नुकसानीचा आकडा ५० लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे.दरम्यान याविषयीची माहिती ही उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.पंचनाम्याची कामे सुरू झाली आहेत, सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही कालावधीत गृहीत धरुन आकडेवराी पाठविली जात आहे. जर सरकारने ही आकडेवारी मान्य केली तर ५० लाख हेक्टरच्या पुढे जाईल,असा अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत.

दरम्यान ऑक्टोबर महिन्यात २६ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ९ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला होता.दरम्यान यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे कारण पंचनाम्याचे अंतिम आकडे अजून हाती आलेले नाहीत.पण साधरण अंदाज घेतल्यास नुकसानीचे आकडे झापाटाने वाढू शकतात,असे सुत्रांचे म्हणणे आहे. महसूल सुत्रांच्या मतानुसार,यंदा १४५ लाख हेक्टरवर पेरा केला आहे.यातील किमान २० ते ३० लाख हेक्टरवरील पिके पावसाने बाधित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची मदत तातडीने मिळण्यासाठी अधिकरी पंचनाम्याची प्रतीश्रा करीत आहेत.

 


दरम्यान खरीप पिकांमध्ये सर्वात जास्त तडाखा सोयाबीनला बसला आहे. यंदा ४३ ते ४४ लाख हेक्टर सोयाबीन उभे होते.पावसामुळे त्यातील १० ते १२ लाख हेक्टर पिकाला तडाखा बसला आहे. तर सोयाबीन बरोबर ४३ लाख हेक्टरच्या आसपास असलेल्या कापूस पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.मात्र,त्याचा निश्चित अंदाज सरकारी यंत्रणेला आलेला नाही.सोयाबीन, कापूस, भात, ज्वारीसह फळपिकांत केळी,पपई, व मोसंबीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसले आहे.दरम्यान अजून कोणतेच चित्र निश्चित झालेले नाही,पण लवकरच केंद्रिय पथक देखील राज्यात येईल अशी चिन्हे आहेत.

केंद्राकडून काय मिळू शकते मदत

केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून आधारित कोरडवाहू पिकाला प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये. तर बागायतीला १३ हजार ५०० रुपये तर फळबागेसाठी १८ हजार रुपये देऊ शकते.याविषयीचा अंदाज एग्रोवन ने वर्तवला आहे. 

दरम्यान राज्य शासन काय करू शकते

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पंचनामा प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे.पंचनाम्याचे राज्यस्तरीय अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवणे.उपलब्ध अहवालाच्या आधारे राज्याच्या नैसर्गिक आपत्ती  निधीतून मदत जाहीर करणे.केंद्राच्या व्यतिरिक्त राज्याच्या  निधीतून विशेष पॅकेज जाहीर करणे.

 

crop damage hectares खरीप पीक नुकसान Kharif crop loss kharif crops पन्नास लाख हेक्टर
English Summary: Crop damage in an area of more than fifty lakh hectares

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.