1. बातम्या

निकृष्ट प्रतीचे बियाण्यामुळे नुकसान झाल्यास भरपाईचा हक्क; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निर्णय

नाशिकच्या चार शेतकऱ्यांच्या एका प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने निर्णय दिला की,निकृष्ट बियाण्यांमुळे पिकाचे नुकसान झाले तर संबंधित शेतकरी बियाणे कंपनीकडून भरपाई मिळविण्यासाठी हकदार आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ccourtesy-lokmat.com

ccourtesy-lokmat.com

नाशिकच्या चार शेतकऱ्यांच्या एका प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने निर्णय दिला की,निकृष्ट बियाण्यांमुळे पिकाचे नुकसान झाले तर संबंधित शेतकरी बियाणे कंपनीकडून भरपाई मिळविण्यासाठी हकदार आहेत.

आयोगाचे  सी. विश्वनाथ आणि न्यायमूर्ती रामसूरत राम मौर्य यांच्या पीठाने नाशिकच्या चार शेतकऱ्यांच्या एका प्रकरणात बियाणे निर्माता कंपनी ची याचिका फेटाळली. निकृष्ट प्रतीचे बियाणे मुळे जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी बियाणे कंपनीकडून भरपाई मिळविण्यासाठी हक्कदार आहेत असे सांगत आयोगाने श्रीराम बायोसीड जेनेटिक्स ला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

या प्रकरणांमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रवीण सुखदेव गव्हाणे, अरुण नारायण, राणू रामभाऊ शिंदे आणि तुकाराम सटवा शिंदे यांनी श्रीराम बायोसीड जेनेटिक्सनेतयार केलेले टोमॅटोचे संकरित बियाणे खरेदी केले. परंतु हे टोमॅटोचे बियाणे पीक तयार झाल्यावर निकृष्ट दर्जाचे निघाले. यावर आयोगाने म्हटले की, चारही शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनी सिद्ध होते की कंपनीकडून बियाणे खरेदी केले गेले होते. त्यामुळे शेतकरी बियाणे कंपनीच्या ग्राहक आहेत.

म्हणून या प्रकरणात कंपनी आणि त्याच्या डीलर्सने शेतकरी प्रवीणला 3.21 लाख रुपये, अरुण यांना 1.60 लाख रुपये, राणू यांना 3.21 लाख रुपये आणि तुकाराम यांना 1.40लाख रुपये  देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तसेच चौघांचाही मानसिक छळ झाल्याने त्यांना सात हजार रुपये आणि तीन हजार रुपये कायदेशीर खर्चासाठी वेगळे देण्याचे आदेशहीआयोगाने दिले.(संदर्भ-दिव्यमराठी)

English Summary: crop damage due to inferior seeds the right to compansation to farmer Published on: 21 October 2021, 10:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters