News

जुलैमध्ये झालेल्या पावसात पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, नुकसान भरपाईचे वितरण कसे केले जाईल, याची माहिती महाराष्ट्र विधानसभेत दिली जाईल, असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सांगितले.

Updated on 20 August, 2022 9:40 AM IST

जुलैमध्ये झालेल्या पावसात पिकांच्या(crop) नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण  झाले असून, नुकसान भरपाईचे वितरण  कसे केले  जाईल, याची माहिती  महाराष्ट्र  विधानसभेत  दिली जाईल, असे  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सांगितले.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे:

पत्रकारांशी बोलताना सत्तार म्हणाले की, एक नवीन कीड बऱ्याच पिकांवर परिणाम करत असून राज्यातील काही जिल्ह्यात उस्मानाबाद, बीड आणि लातूर  येथे  आपले कृषी तज्ज्ञ  बाधित क्षेत्रांना भेटी देऊन उपाययोजना करती आहेत आणि भविष्यात यावर कसा मार्ग काढावा यावर महत्व देत आहेत. जुलैसाठी पीक  नुकसानीचा पंचनामा  (तपशीलवार मूल्यांकन) पूर्ण झाला आहे. तथापि, ऑगस्टच्या पहिल्या सहामाहीत झालेल्या पावसामुळे(rain) झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण झाले नाही,असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:मातीची गुणवत्ता जपण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे:पंतप्रधान नरेंद्र मोदी

सध्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नागपूर, अमरावती आणि मराठवाडा विभाग या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी  जाहीर  केलेल्या  निम्म्या  मदतीचा पंचनामा पूर्ण झाला आहे. उर्वरित मदत येत्या काही दिवसांत केली जाईल. राज्य सरकारने हेक्टरी 13,600 रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मी सोमवारी विधानसभेत माहिती देणार आहे.असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा:7 वा वेतन आयोग,कर्मचार्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत DA थकबाकी मिळू शकणार

तसेच उस्मानाबाद, बीड आणि लातूरमध्ये 'गोगल गे' या  नवीन कीटकाचा  पिकांवर  परिणाम होत  असल्याची माहिती  मंत्र्यांनी दिली.पुढे राज्याचे  कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, "कृषी विभागाचे एक पथक आणि तज्ञांना या प्रदेशात भेट देण्यास सांगितले गेले आहे आणि या नवीन कीटक धोक्याविरूद्ध उपाय शोधून काढा."

English Summary: Crop assessment completed, farmers will receive compensation immediately: Abdul Sattar
Published on: 20 August 2022, 09:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)