News

रब्बी हंगामातील पिकांची उगवण होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने बरसायला सुरू केले. खरीप हंगामातील पिकांचे जे नुकसान झाले होते ते भरून काढण्यासाठी जे शेतकऱ्यांनी नियोजन केले होते त्या नियोजनावर पूर्ण पाणी फेरले गेले. तर मराठवाड्यातील काही भागात दुबार पेरण्या कराव्या लागल्या गेल्या. पेरण्या होऊन १५ दिवस झाले तेव्हा आता नांदेड जिल्ह्यात हिरवे वातावरण बघायला भेटत आहे. मागील काही दिवसांपासून पाऊसाने उघडीप दिल्याने पिकांना पोषक असणारी थंडी सुद्धा पडलेली आहे त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू तसेच ज्वारी ही पिके बहरताना दिसत आहेत. हवामानात सारखा बदल होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव खाली वर होत होता मात्र आता वातावरण कोरडे राहील असे तज्ञांनी अंदाज लावलेला आहे.

Updated on 17 December, 2021 5:47 PM IST

हरभरा पिकाला पोषक वातावरण:-

रब्बी हंगामातील पिकांना थंडीची आवश्यकता असते तरच पिके जोमाने वाढतात मात्र पेरणी झाली की लगेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि ढगाळ वातावरण झाल्यामुळे हवेमध्ये दमट वातावरण निर्माण झाले. यामुळे हरभरा पिकावर घाटीअळी तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव पडला त्यामुळे खरीप हंगामाची जशी अवस्था झाली तशीच रब्बी हंगामाची होईल का असा प्रश्न समोर आलेला आहे पण आता थंडीला वाढ झाल्याने पिके जोमात वाढू लागली आहेत. आता रब्बी मधील पिके जोमात वाढून उत्पादन देतील अशी अपेक्षा आहे.

यंदा हरभरा पिकावरच शेतकऱ्यांचा भर:-

मराठवाड्यात प्रत्येक वर्ष ज्वारी पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते मात्र आता उत्पादन वाढण्यासाठी पिकात फेरबदल होत आहेत. तसेच कृषी विभागाने हरभरा पेरावा असे आहवाण केले आहे. फक्त एवढेच न्हवे तर हरभरा बियानाच्या अनुदानावर वाटप करण्यात आलेले आहे. हरभरा चा टप्पा वाढत आहे मात्र त्याची चांगल्या प्रकारे जोपासना करावी लागणार आहे. आता पोषक वातावरणात चांगल्या प्रकारे उत्पादन निघेल अशी अशा शेतकऱ्यानं आहे.

रोगराईचा प्रादुर्भाव झाला कमी:-

वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पडतो त्यामुळे शेतकरी वर्गाला योग्य त्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. सध्या चांगल्या प्रकारे थंडी पडली असल्याने मर रोग तसेच घाटीअळी चा प्रादुर्भाव कमी झाला असून फक्त हरभरा पीक च न्हवे तर दुसरी पिके सुद्धा जोमाने वाढायला सुरू झाले आहे.

असे करा व्यवस्थापन...

सध्या काही भागात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळला तर तुम्ही लगेच निंबोळी अर्काची फवारणी करून घ्यावी. जर गरज पडली तर कीड प्रतिबंधात्मक फवारणी सुद्धा करून घ्यावी ज्यामुळे हरभरा चे उत्पादन जोमाने वाढेल.

English Summary: Crisis over rabi season crops, gram flourishing in severe cold.
Published on: 17 December 2021, 05:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)