News

खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात चांगला प्रयोग केला मात्र संकटांची मालिका काय शेतकऱ्यांचा पिछा सोडत नाही. रब्बी हंगामात पेरणी केल्यापासून ते हंगाम मध्यावर असेपर्यंत विघ्न येतच राहिली आहेत. ही संकटे कमी काय तो पर्यंत कृषी विभागाने अनेक एक गोष्ट चिंता वाढवणारी समोर आणलेली आहे. मंत्रालायत जी खत पुरवठा साठी बैठक पार पाडली त्या बैठकीत ययेणाऱ्या खरीप हंगामात युरियाचा तुटवडा पडणार असल्याचे संकेत दर्शवली आहेत.

Updated on 03 February, 2022 7:04 PM IST

शेतकऱ्यांकडून मागणी त्याच खताचा तुटवडा :-

खरीप हंगामात पिकांची जोरात वाढ व्हावी तसेच उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी 10:26:26 आणि 12:32:16 या खतांची मागणी करत असतात. परंतु दिवसेंदिवस पोटॅश आणि फॉस्फेरिक अॅसिडच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढतच आहेत त्यामुळे खत कंपन्यांना पोटॅश मिळणे अशक्य झाले आहे आणि जर अशी परिस्थिती कायम राहिली तर दरात तर वाढ होणारच आहे शिवाय मागणीनुसार पुरवठा होणार नाही अशी शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

काय आहे उपाययोजना?

खरीप हंगामातील उत्पादन हे खतावर च अवलंबून असते. जे की यंदाच्या वर्षी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांना नुकसानीत राहिले आहेत आणि अशा परिस्थितीत आता आगामी खरीप हंगामात खताचा तुटवडा होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत आता खताचे उत्पादन वाढवणे खूप गरजेचे राहणार आहे. तसेच खत कंपन्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करणे गरजेचे राहणार आहे तरच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांकडे इतर खताचे कोणते पर्याय?

18:46 या खतानेच पिकांना चांगला बहार येतो अशी मानसिकता शेतकऱ्यांनी करुण घेतली असल्यामुळे खत विक्रेते शेतकऱ्यांचा फायदा घेत आहेत. खत विक्रते या खतांची कृत्रिम पणे टंचाई करून अधिकच्या दराने खते विकत आहेत. जरी 18.46 हे खत उपलब्ध झाले नसेल तर मिश्र खतांचा पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. मिश्र खतांचा वापर करूनही उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करूनही खत वापरता येणार आहे असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

English Summary: Crisis continues on farmers, shortage of fertilizers in forthcoming kharif season
Published on: 03 February 2022, 07:03 IST