News

मागच्या काही महिन्यांपूर्वी पाहिले तर टोमॅटो चा अक्षरशः रस्त्यांवर लाल चिखल पाहायलामिळाला होता. टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि बाजारपेठेत आणण्या पर्यंतचा खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकर्यांयनी टोमॅटो फेकून देणे पसंत केले होते.

Updated on 28 November, 2021 3:13 PM IST

मागच्या काही महिन्यांपूर्वी पाहिले तर टोमॅटो चा अक्षरशः रस्त्यांवर लाल चिखल पाहायलामिळाला होता. टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतआणण्यापर्यंतचा खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी टोमॅटो फेकून देणे पसंत केले होते.

परंतु आता याच मातीमोल झालेल्या  टोमॅटोला सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे. अगदी किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव 47 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. यामागे बरीच कारणे आहेत. या लेखात आपण टोमॅटोचे भाव वाढीचे नेमके कारण काय? टोमॅटो भाव वाढीबद्दल क्रीसिलचा रिपोर्ट काय म्हणतो? हे जाणून घेणार आहोत.

 टोमॅटो दरवाढीबाबत क्रीसिलचा अहवाल

 टोमॅटोची वाढीव भाव आहे या येणारा दोन महिन्यांपर्यंत तसेच राहतील अशी चिन्हे असल्याची बाब क्रीसिल रिसर्चच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

टोमॅटोचे मुख्य उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटक मध्ये टोमॅटोची इतकी भयानक परिस्थिती आहे की, कर्नाटक मध्ये नाशिकमधून टोमॅटो पाठवला जात आहे असे क्रिसिलने  अहवालात म्हटले आहे. या अहवालामध्ये नमूद केल्यानुसार ऑक्टोबर डिसेंबर च्या दरम्यान प्रमुख टोमॅटोचे उत्पादन क्षेत्र असलेल्या कर्नाटकामध्ये सरासरीपेक्षा 105 टक्के अधिक, आंध्रप्रदेश मध्ये सरासरीपेक्षा 40 टक्के अधिक आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 22 टक्के अधिक पाऊस झाल्यामुळे टोमॅटोचे पीक आडवे झाले.

देशाला टोमॅटोचा पुरवठा प्रामुख्याने याच राज्यांमधून केला जातो.क्रिसीलच्या अहवालानुसार,मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पिकांची कापणी जानेवारीपासून सुरू होईपर्यंत आगामी येणाऱ्या दोन महिन्यांपर्यंत टोमॅटो भाव खाणार आहेत. 25 नोव्हेंबर पर्यंत टोमॅटो च्या भावात 142 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. टोमॅटो ची ताजी आवक सुरू होईल तेव्हा भाव 30 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.(संदर्भ- इंडिया दर्पण)

English Summary: crisil report says the tommato supply of other state is depends on nashik
Published on: 28 November 2021, 03:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)