News

सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे, यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Updated on 24 June, 2020 1:44 PM IST

सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे.  यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हातात पैसा नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. ही बाब लक्षात घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बँकांना ताकीद दिली आहे.  शेतकऱ्यांना कर्ज न देणे ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले. ज्या बँका पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

English Summary: criminal cases will be filed against banks that do not provide loans to farmers says home minister anil deshmukh
Published on: 24 June 2020, 01:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)