खरीप हंगामात जशी संकटांची मालिका सुरू होती तसेच रब्बीमध्ये सुद्धा सुरूच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर पाठोपाठ संकटे येतच आहे. हे कमी तो पर्यंत खतांची विक्री वाढीव किमतीने होत असल्याने शेतकरी अजूनच अडचणीत अडकला आहे. रब्बी हंगामातील पिके थंडीत कुठे बहरत आहेत तो पर्यंत मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल घडत आहे त्यामुळे पिकासाठी खताचा वाढीव डोस द्यावा लागणार आहे. विक्रेता खतांचा तुटवडा म्हणत त्यासोबत दुसरे वाढीव खत घेण्यास बंधनकारक करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. थोडक्यात शेतकऱ्यांची लूट होत आहे.
नेमक्या कोणत्या खताची होतेय मागणी :-
१०:२६:२६ या खताची रब्बीतील पिकांची वाढ होण्यासाठी मागणी होत आहे मात्र या खताची टंचाई आहे असे विक्रेते सांगत आहेत. तर काही विक्रेते म्हणत आहेत की हे खत मिळेल पण यासोबत दुसरे पण खत घ्यावे लागेल अशी अट घालत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. १४४० रुपये ज्या खताची गोनी आहे त्याच गोनी ची किमंत १८०० रुपये वर घेऊन गेले आहेत. हे असताना अजून यावर दुसरे मिश्र खत न्यावे लागेल अशी अट शेतकऱ्यांना खत विक्रेत्यांनी घातलेली आहे.
अन्यथा विभागीय कृषी कार्यालयालाच घेराव :-
शेतकऱ्यांना खताची गरज आहे हे लक्षात आले असून विक्रेत्यांनी वाढीव दराने खताची विक्री करणे सुरू केले आहे. त्या खताबरोबर दुसरे मिश्र खत घेणे सुद्धा बंधनकारक केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत आणि त्यात अशी विकर्त्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याने शेतकरी दोन्ही बाजूने संकटात अडकला आहे. कृषी खात्याने आता पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे नाहीतर विभागीय कृषी कार्यालयाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने घेराव घातला जाईल असा ईशारा दिला आहे.
कृषी विभागाची महत्वाची भूमिका- दिघोळे :-
पिकांच्या वाढीसाठी आता कुठेतरी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खत फवारणी सुरू आहे पण आता निसर्गाचा लहरीपणा झाला आणि विक्रेत्यांचा लहरीपणा सुरू झाला आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे चे मत आहे की कृषी विभागानेच उपलब्ध असलेल्या खताचा साठा करून शेतकरी मागतील त्या खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करावा असे यांचे मत आहे.
Published on: 28 January 2022, 04:41 IST