लवकरात लवकर गायीच्या छत्तीसगडमध्ये शेनापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बेमेतारा जिल्ह्यामध्ये दोन ऑक्टोबरला आयोजित केलेल्या शेतकरी संमेलनामध्ये त्याचे उद्घाटन केले.
याबाबत माहिती देताना छत्तीसगड राज्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की छत्तीसगड मधील गावे आता गायीच्या शेनापासून तयार केल्या गेलेल्या विजेमुळे झगमगतील. पुढे त्यांनी सांगितले की ग्रामीण इंडस्ट्रियल पार्क गौथन्समध्ये स्थापित केलेल्या यंत्रांद्वारे वीजनिर्मिती केली जाईल.या अधिकाऱ्याने गायीच्या शेनापासून वीज निर्मितीची प्रक्रिया संतांना म्हटले की एक युनिट गायीच्या शेनापासून 85 क्युबिक मीटर गॅस चे उत्पादन होईल.
अशा पद्धतीने एक क्युबिक मीटर गायीच्या शेनापासून 1.8 किलोवॅट प्रति घंटा वीजनिर्मिती होईल. या पद्धतीने एका युनिटमध्ये 153 किलोवॅट वीजनिर्मिती प्रति घंटा होईल. अशा पद्धतीने तीन गौथान मध्येलावलेल्या युनिटच्या माध्यमातून जवळजवळ 460 किलोवॅट युनिट विज प्रतितास निर्माण केली जाईल.
गावा गावातील शेतकऱ्यांना पैसे देऊन जमा केले गाईचे शेण
सूराज गाव योजनेच्या माध्यमातून छत्तीसगड सरकारने राज्यामध्ये 10112 गौथानोस्थापन करण्याची मंजुरी दिली आहे. यामध्ये 6112 गौठाणची निर्मिती केली गेली आहे. गावा गावातील शेतकऱ्यांकडून पैसे देऊन जवळजवळ 51 लाख क्विंटल गाईचे शेण जमा करण्यात आले आहे.प्रति किलो दोन रुपये या भावाने हेशेणखरेदी करण्यात आले आहे.
आतापर्यंत जवळजवळ 102 कोटी रुपये शेन खरेदी करण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. तसेच बारा लाख क्विंटल वर्मी कंपोस्ट आणि सुपर कंपोस्ट बनवले गेले आहे.
अशा पद्धतीने एक क्युबिक मीटर गायीच्या शेनापासून 1.8 किलोवॅट प्रति घंटा वीजनिर्मिती होईल. या पद्धतीने एका युनिटमध्ये 153 किलोवॅट वीजनिर्मिती प्रति घंटा होईल. अशा पद्धतीने तीन गौथान मध्येलावलेल्या युनिटच्या माध्यमातून जवळजवळ 460 किलोवॅट युनिट विज प्रतितास निर्माण केली जाईल.
Published on: 03 October 2021, 09:44 IST